आयएनएस विक्रांत विमानवाहू युद्धनौकेच्या चाचण्या सुरु; या वर्षी नौदलात सामील होणार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेची तिसरी चाचणी सध्या सुरू आहे. विविध हवामानात ती कशी कार्य करते, याची चाचणी घेतली जात आहे.INS Vikrant aircraft carrier Trials begin; Will join the Navy this year

२००९ मध्ये युद्धनौकेच्या निर्मितीस कोचीन शिपयार्ड येथे सुरुवात झाली होती. नौका तयार झाली असून ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये तिच्या चाचण्या घेण्यात आल्या. तीन समुद्रांनी वेढलेल्या समुद्रकिनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी भारताला दोन विमानवाहू युद्धनौकांची गरज भासते.



सध्या भारताच्या नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विक्रमादित्य ही रशियन बनावटीची विमानवाहू युद्धनौका आहे. आता आयएनएस विक्रांत लवकरच ताफ्यात समाविष्ट होणार असल्याने नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. सध्या युद्धनौकेच्या तिसरी चाचणी सुरु आहे.

त्यात विविध हवामानात युद्धनौका कशी काम करते. लढाऊ विमानाचे उड्डाण आणि उतरणे आदी चाचण्या करण्यात येणार आहेत. चाचण्या आणि शस्त्रास्त्रयुक्त झाल्यावर या वर्षी ही युद्धनौका भारतीय नौदलात समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे.

INS Vikrant aircraft carrier Trials begin; Will join the Navy this year

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात