Terrorist Attack : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 12 जवान जखमी झाल्याची माहिती आहे. या गोळीबारात तीन जवान गंभीर जखमी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. Terrorist attack on security forces bus in Srinagar, 12 injured in shooting, 3 in critical condition
वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 12 जवान जखमी झाल्याची माहिती आहे. या गोळीबारात तीन जवान गंभीर जखमी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दोन ते तीन दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या बसवर गोळीबार केला. जवानांनी भरलेली बस श्रीनगरच्या बाहेरील जवान येथे असलेल्या पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या दिशेने जात होती. या बसमध्ये जम्मू-काश्मीर सशस्त्र पोलिसांच्या नवव्या बटालियनचे जवान प्रवास करत होते. जिल्ह्याच्या परिसरात केवळ जम्मू-काश्मीर पोलिसांचे प्रशिक्षण केंद्र नाही, तर लष्कर आणि सीआरपीएफचे अनेक कॅम्पही आहेत.
Terrorists fired upon a police vehicle near Zewan in Pantha Chowk area of Srinagar. 14 personnel injured in the attack. All the injured personnel evacuated to hospital. Area cordoned off. Further details shall follow: Kashmir Zone Police (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/IfEXEh3wii — ANI (@ANI) December 13, 2021
Terrorists fired upon a police vehicle near Zewan in Pantha Chowk area of Srinagar. 14 personnel injured in the attack. All the injured personnel evacuated to hospital. Area cordoned off. Further details shall follow: Kashmir Zone Police
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/IfEXEh3wii
— ANI (@ANI) December 13, 2021
यापूर्वी, श्रीनगरच्या बाहेरील भागात सुरक्षा दलांनी दोन अज्ञात दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. रंगरेथ भागात ही चकमक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटरवर सांगितले की, दोन दहशतवादी मारले गेले आहेत, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
Terrorist attack on security forces bus in Srinagar, 12 injured in shooting, 3 in critical condition
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App