जाणून घ्या पंतप्रधान मोदींनी काय दिला सल्ला; २०२०च्या कोविड प्रादुर्भावादरम्यान तनिष्काचं पितृछत्र हरपलं आणि आजोबांचाही मृत्यू झाला आहे.
विशेष प्रतिनिधी
इंदूर : मध्य प्रदेशची तनिष्का सुजीत ही वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी बॅचरल ऑफ आर्ट्सच्या अंतिम वर्षाची परीक्षा देऊन इतिहास रचणार आहे. कायद्याचा अभ्यास करून देशाचे सरन्यायाधीश बनणे हे तनिष्काचे पुढील ध्येय आहे. काही दिवसांपूर्वी तनिष्काने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तनिष्काने मोदींसोबतची तिची भेट आठवली आणि सांगितले की, कशाप्रकारे पंतप्रधान मोदींनी तिला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तनिष्काचे वडील आणि आजोबा यांचा २०२०च्या कोविड प्रादुर्भावादरम्यान मृत्यू झाला आहे. Tanishka Sujeet will become the youngest graduate
तनिष्का सर्वात तरुण पदवीधर विद्यार्थी होणार –
तनिष्का सुजीत ही इंदूरच्या देवी अहिल्या विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. ती मानसशास्त्रात पदवीचे शिक्षण घेत आहे आणि ती बीएच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिची परीक्षा १९ एप्रिलपासून सुरू होत आहे, जी २८ एप्रिलपर्यंत चालणार आहे आणि निकालानंतर तनिष्का सर्वात तरुण पदवीधर विद्यार्थी होणार आहे.
तनिष्काने दहावी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी बारावीची परीक्षा दिली होती. देवी अहिल्या विद्यापीठाच्या सामाजिक विज्ञान अभ्यास विभागाच्या प्रमुख रेखा आचार्य यांनी सांगितले की, तनिष्काने वयाच्या १३व्या वर्षी बीए (मानसशास्त्र) च्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता, कारण तिने विद्यापीठाने घेतलेल्या प्रवेश परीक्षेत चांगली कामगिरी केली होती.
पंतप्रधान मोदींच्या भेटीचे स्वप्न झाले साकार –
जॉइंट कमांडर्स कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी भोपाळला आले असताना, तनिष्का सुजीतने पंतप्रधानांची भेट घेतली. ही बैठक सुमारे १५ मिनिटे चालली. यादरम्यान तनिष्काने पंतप्रधान मोदींना सांगितले होते की, बीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिला अमेरिकेत कायद्याचे शिक्षण घ्यायचे आहे.
याशिवाय तनिष्काचे भारताचे सरन्यायाधीश होण्याचे स्वप्न आहे. तनिष्काचे स्वप्न ऐकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तिला सुप्रीम कोर्टात जाण्याचा आणि तेथील वकिलांचा युक्तिवाद पाहण्याचा सल्ला दिला. तनिष्का म्हणाली की, पंतप्रधानांना भेटणे माझ्यासाठी स्वप्नपूर्तीसारखे होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App