विशेष प्रतिनिधी
चेन्नई : वैद्यकीय प्रवेशासाठी तामीळनाडूने वेगळी चूल मांडली आहे. तमिळनाडू विधानसभेत नीटविरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे. नीट परीक्षेऐवजी बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय शाखांना प्रवेश द्यावा असे या विधेयकात म्हटले आहे.Tamil Nadu assembly passes Bill for medical admissions without NEET
मुख्यमंत्री एम.के.स्टालिन यांनी हे विधेयक मांडले. त्याला अद्रमुक, पीएमके, काँग्रेस यांनी पाठिंबा दिला. आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर झाले. याच प्रकारे २०१७ मध्ये अद्रमुकने विधेयक मंजूर केले होते, पण त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली नव्हती.
तमिळनाडूत नॅशनल एन्ट्रन्स कम एलिजिबिलीटी टेस्ट म्हणजे नीट परीक्षेत अपयशाच्या भीतीने एका वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या इच्छुकाने आत्महत्या केली आहे. त्या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले. सोमवारी विरोधी अद्रमुकने सरकारला धारेवर धरले. त्यानंतर मुख्यमंत्री एम.के.स्टालिन यांनी हे विधेयक सादर केले. त्यात वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासासाठी नीटमधून सूट देण्याची तरतूद आहे. बारावीच्या गुणांच्या आधारे सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर प्रवेश देण्याची घोषणा त्यांनी केली.
स्टालिन यांनी नीट परीक्षेतून सूट देणारे हे विधेयक सादर केले. त्यात वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीटमधून सूट देण्याचा प्रस्ताव असून बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. दंतवैद्यक, होमिओपॅथी या सर्व अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी नीट गरजेची असणार नाही, अशी विधेयकात तरतूद आहे.
विरोधी पक्षनेते के. पलानीस्वामी यांनी सालेम जिल्ह्यात १९ वर्षे वयाच्या धनुष या मुलाने आत्महत्या केल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, द्रमुकने नीट परीक्षा रद्द करण्याचे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता झाली नाही. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास चांगल्या प्रकारे करता आला नाही.
रविवारी धनुष हा मुलगा तिसऱ्यांदा नीट परीक्षेसाठी चालला असताना त्याने परीक्षेतील अपयशाच्या भीतीने आत्महत्या केली. या प्रकरणी अद्रमुकने द्रमुकला जबाबदार ठरवले असून राज्य सरकारने केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री स्टालिन यांनी सांगितले की, तमिळनाडूत नीट परीक्षा पहिल्यांदाच झाली तेव्हा पलानीस्वामी मुख्यमंत्री होते.
जयललिता मुख्यमंत्री असताना ही परीक्षा घेण्यात आली नव्हती. एस. अनिता हिच्यासह अनेकांनी नीट परीक्षा प्रकरणी आत्महत्या केल्या असून हे सर्व पलानीस्वामी यांच्या काळात झालेले आहे. धनुष हा दोनदा नीट परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नव्हता, त्यावेळी अद्रमुकची सत्ता होती. स्टालिन यांनी २०१७ मध्ये नीटमधून सूट देणारी विधेयके नाकारल्याचा आरोपही अद्रमुकवर केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App