अफगाणिस्तानच्या ८० टक्के भूभागावर तालिबानच्या दहशतवाद्यांचा ताबा, जगाचा धोका पुन्हा वाढणार

विशेष प्रतिनिधी

काबूल – उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान सीमेलगत असलेल्या नोवज्जान प्रांताची राजधानी शबरघान येथे भीषण युद्धानंतर तालिबानच्या दहशतवाद्यांनी वर्चस्व मिळवले. त्यामुळे अफगाणिस्तानच्या ८० टक्के भागांवर तालिबानने ताबा मिळवला आहे.Taliban holds on 80 percent of Afghan region

वर तालिबानचा झेंडा हा आतापर्यंतचा दहशतवाद्यांचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. अफगाणिस्तानला मध्य आशियाला जोडणारा रस्ता याच शहरातून गेला आहे. या मार्गावरून अमली पदार्थाची तस्करीही मोठ्या प्रमाणात होते. युरोपला याच शहरातून अमली पदार्थ जातात. त्यामुळे या शहरावर ताबा मिळवल्याने तालिबानकडे मोठा आर्थिक स्रोत आला आहे.



तालिबानने यापूर्वीही २०१५ आणि २०१६ रोजी काही काळासाठी कुडुंज शहरावर ताबा मिळवला होता. आता कुडुंज शहरातून तालिबानच्या दहशतवाद्यांना हुसकावून लावणे हे अफगाणिस्तानच्या सैनिकांसमोर मोठे आव्हान असेल. दीर्घकाळापर्यंत कुडुंजवर तालिबान्यांचे वर्चस्व राहिले तर त्यांच्यासाठी नवीन स्रोत तयार होईल.

तालिबानने पाच प्रांताच्या राजधानींवर ताबा मिळवला आहे. उत्तरेत कुंडुज, सर ए पोल आणि तालोकानवर तालिबानने वर्चस्व मिळवले आहे. दक्षिणेत इराण सीमेशी लगत निमरोज प्रांताची राजधानी जरांजवर तालिबानने ताबा मिळवला.

Taliban holds on 80 percent of Afghan region

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात