कर्जाच्या आर्थिक दलदलीतून त्वरित बाहेर पडा


पैसे मिळवणे जितके महत्वाचे असते तितकेच किंवा त्याहीपेक्षा ते टिकवणे व वाढवणे अधिक महत्वाचे असते. आर्थिक नियोजनाचा अभाव हे गरीबीचे फार महत्वाचे कारण अनेकदा असते. कित्येकदा असेही होते, की आपण थेंब थेंब साचवुन बचत करतो खरी, पण एखादी मेडीकल इमर्जन्सी, एखादा अपघात, एखादी दुर्दैवी घटना आपली सगळी मोठ्या कष्टाने जमवलेली बचत आणि मेहनत पाण्यात घालते. म्हणुन आयुष्यात आर्थिक नियोजन करणे, अत्यंत आवश्यक आहे. स्वतःचा, कुटूंबीयांचा हेल्थ इन्शुरंस, मेडीक्लेम, विमा पॉलीसी, एक्सीडेंट आणि सिरीयस आजारांवर कव्हर घेणे काळाची गरज आहे. ज्यांच्याकडे फायनान्शिअल प्लानिंग नसतं, अशा लोकांवर वाईट वेळ आली, एखादा संकटाचा तडाखा बसला, की पर्सनल लोन, गोल्ड लोन अशा महागड्या व्याजांची कर्ज उचलण्याची आणि नंतर पस्तावण्याची वेळ येते. नंतर उशीराने शहाणपण सुचुन काही फायदा नसतो. आग लागल्यावर विहीर खोदुन आग विझवता येईल काय? म्हणुन आर्थिक नियोजन अत्यंत महत्वाचे आहे. कर्ज ही आर्थिक दलदल आहे, त्यातून माणुस जितका बाहेर यायचा प्रयत्न करतो, तितका तो आत फसत जातो. त्यामुळे जेव्हा अत्यंत गरज आहे तेव्हाच मोठे कर्ज घ्यावे. Get out of debt financially quickly

उदाहरणार्थ घर खरेदीसाठीचे कर्ज. अन्य वस्तूंसाठी कर्ज घेणे फारसे हितकारक नसते. झटपट सुखसुविधा हव्या असं मानणारी लोकं कार लोन, इएमआयवर गॅझेट्स, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट, क्रेडीट कार्डने अतिखरेदी असे मार्ग वापरतात. अशा वेळी आपला महीन्याचा इ. एम. आय. हा आपल्या पगाराच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त कधीही नसावा, अन्यथा पुढे आपल्यासाठी ती धोक्याची घंटा ठरते. आणि एक सर्वात महत्वाचा प्रश्न जो व्यक्ती सतत नेहमी, कर्जाच्या आणि व्याजाच्या ओझ्याखाली दबुन गेला असेल, तो बचत कशी काय करु शकणार? त्यामुळे अगदी कर्ज घ्यायची वेळ आलीच तर कमीत कमी व्याजदाराची कर्ज कशी मिळवता येतील ह्याबद्द्ल आग्रही राहिले पाहिजे. तसेच कर्ज मुदतीआधी फेडण्यासाठी नेहमी प्रयत्न केला पाहिजे. तरच मग उरलेले पैसे योग्या ठिकाणी गुंतविता येतात.

Get out of debt financially quickly

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात