अफगाणिस्तानच्या हवाई दलाचे बॉंबहल्ले, पाचशे तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा


वृत्तसंस्था

काबूल – अफगाणिस्तानच्या हवाई दलाने विविध प्रांतांमध्ये हवाई हल्ले करत ५७२ तालिबानी दहशतवाद्यांना ठार मारले असून ३०९ दहशतवादी जखमी झाले आहेत. 500 talibani died in air strike

संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी फवाद अमन यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. हवाई दलाने नानगरहर, लघमन, पाक्तिया, पाक्तिका, कंदाहार, उरुझगन, हेरत, फराह, हेल्मंड, निमरुझ, कुंदूझ आणि इतर काही भागांमध्ये तालिबानी दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर विमानातून हल्ले केले. हे हल्ले अत्यंत अचूक होते आणि त्यात एकूण ५७२ दहशतवादी मारले गेल्याचा दावा अमन यांनी केला आहे.


बडगाम चकमकीत एक दहशतवादी ठार, चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रसाठा जप्त


 

दोन दिवसांपूर्वीही सरकारने केलेल्या हवाई कारवाईत किमान दोनशे तालिबानी मारले होते. या हल्ल्यात तालिबान्यांचा मोठा शस्त्रसाठा आणि शंभराहून अधिक वाहने नष्ट झाली होती. अमेरिकेच्याही विमानांनी हवाई हल्ले केले. त्यांनी काल (ता. ७) संध्याकाळी बी- ५२ बाँबर विमानाच्या साह्याने जॉजान प्रांतात शाबिरगन येथे तालिबान्यांच्या एका मेळाव्यावर बाँबफेक केली. यामध्ये मोठ्या संख्येने तालिबानी मारले गेले, असे अमन यांनी सांगितले.

500 talibani died in air strike

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण