अमेरिका, रशियाची असंख्य शस्त्रास्त्रे तालिबानी दहशतवाद्यांच्या हाती ; अमेरिकेकडून चिंता व्यक्त


वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानमध्ये अमेरिका, रशियाची अनेक घातक शस्त्रास्त्रे तालिबानच्या हाती लागली आहेत. या शास्त्राची संख्या काही देशांच्या लष्करी सामग्री एवढी असल्याने अमेरिकेने चिंता व्यक्त केली. Taliban got Dangerous weapons from Afghanistan, several weapons including guns, ammunition, helicopters and more

तालिबान्यांनी अफगानिस्तानावर कब्जा केला. यानंतर चीन, रशिया, पाकिस्तान, बांग्लादेश सारख्या देशांनी तालिबानची बाजू घेतली आहे, तर भारत, अमेरिका, ब्रिटन सारख्या देशांनी तालिबान विरोधी बाजू घेतली आहे.अनेक देशानी सावध भूमिका घेतली आहे. तालिबानच्या ताब्यात एक अजिंक्य प्रांत सोडता उर्वरित अफगानिस्तान ताब्यात आले आहे. यापेक्षा खळबळजनक बाब म्हणजे, तालिबानच्या हाती अमेरिका, रशियाच्या अद्ययावत शस्त्रास्त्रांचे भांडार लागले आहे.

सोमवारपासून अफगाणिस्तानात तालिबानी रस्त्यावर फिरू लागले आहेत. त्यांना विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. झेंड्यावरून प्रदर्शन करणाऱ्या लोकांवर गोळीबार केला होता. धक्कादायक बाब म्हणजे मिशन पूर्ण होताच शस्त्रांनी भरलेले ट्रकचे ट्रक पाकिस्तानात पाठविण्यात आले आहेत. ही शस्त्रे तालिबानींसाठी पाकिस्तानने पुरविली होती. परंतू, या मागे आणखी एक कारण समोर आले आहे.



तालिबान दहशतवाद्यांच्या हाती अमेरिका, रशिया आणि युएनने अफगानिस्तान सैन्याला दिलेली शस्त्रे लागली आहेत. या शस्त्रास्त्रांची किंमत अब्जावधी डॉलर आहे. शस्त्रे पाहता अनेक देशांच्या बरोबरीने तालिबानची ताकद तयार झाली आहे. ही ताकद रातोरात मिळाल्याने तालिबान प्रबळ झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे तालिबानकडे आता अफगाण सैन्यातील प्रशिक्षित जवान, पायलट आहेत. जिवाच्या भितीने ततालिबानला सामिल झाले आहेत.
अफगाण सैन्याने अत्यंत घातक शस्त्रे तिथेच टाकून पळ काढल्याने मोठमोठे शस्त्र भांडार तालिबानच्या हाती लागले आहेत.

कोणती शस्त्रे हाती लागली

लष्करी हेलिकॉप्टर, रणगाडे, बुलेटप्रूफ गाड्या, तोफा असलेली वाहने, रशियन हेलिकॉप्टर उडविणारे पायलट देखील तालिबानकडे आहेत. अमेरिकेचे Mi-24 अटॅक चॉपर्स, UH-60 ब्लॅकहॉक, रशियाचे Mi-8/17 ट्रांसपोर्ट आणि ब्राझीलचे A-29 सुपर टुकानो लाइट फाइटर्स ही लढाऊ विमाने तालिबानच्या ताब्यात आली आहेत.

हवाई हल्ले परतवून लावण्यासाठीचे असंख्य तोफा, आर्मी पिकअप ट्रक, कंटेनर्स मिळाले आहेत. तालिबानने सैन्याचे तळदेखील ताब्यात घेतले आहेत. यामध्ये असंख्य बंदुका, करोडो गोळ्या आणि अज्ञात संख्येने शस्त्रास्त्रे आहेत. सैन्याने मागे हजारो ग्रेनेड, रॉकेट आणि अन्य सामग्री सोडली आहे. रशियाचे T-55/62 टँक, 50 हून अधिक अमेरिकी M-1117 टँक आता या दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत.

Taliban got Dangerous weapons from Afghanistan, several weapons including guns, ammunition, helicopters and more

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात