३१ ऑगस्टपर्यंत सारे सैन्य माघारी घ्या, दिलेला शब्द पाळण्याची तालिबानची अमेरिकेला धमकी

वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानातून अमेरिकेची घरवापसी ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे. यादरम्यान तालिबानकडून अमेरिकी सैनिकांना धमक्या दिल्या जात आहेत. जर ३१ ऑगस्टपर्यंत देश सोडला नाही तर अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा तालिबानने दिला आहे. Taliban gives hard signal to USAतालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन म्हणाला की, अमेरिकेच्या अध्यक्षांनी ३१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण सैन्य काढून घेण्याबाबतचे आश्वािसन दिले आहे. त्यांनी या मतावर ठाम राहिले पाहिजे. ३१ ऑगस्टनंतर एक दिवस देखील अधिक काळ अफगाणिस्तानच्या जमिनीवर नाटो आणि अमेरिकी सैनिक चालणार नाही. र सैनिक माघारीसाठी अधिक वेळ मागितला तर त्याचे उत्तर नाहीच असेच असेल.

त्याचबरोबर या देशांना गंभीर परिणाम भोगण्यासाठी तयार राहावे लागेल. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सुरवातीला ११ सप्टेंबरपर्यंतचा कालावधी निश्चिेत केला होता. परंतु आता तो ३१ ऑगस्ट केला आहे.

Taliban gives hard signal to USA

महत्त्वाच्या बातम्या