अफगाणमध्ये अडकलेले १४६ भारतीय परतले, बचाव कार्य अंतिम टप्प्यात

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – अफगाणिस्तानात अडकलेल्या आणखी १४६ जणांना सुखरूपरित्या भारतात परत आणण्यात आले. तेथील बचावकार्य आता अंतिम टप्प्यात आले असून, तेथील नागरिकांना परत आणण्यासाठी आता केवळ दोन विमाने पाठविण्यात येणार आहेत. 146 Indians back in country

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे हे बचावकार्य अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर हे अभियान पूर्ण होईल. आतापर्यंत हवाई दल आणि एअर इंडियाची सहा विमाने या कार्यात वापरण्यात आली. त्यातून अफगाणिस्तानातून लोकांना भारतात आणण्यात आले. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांना सुरक्षितपणे आणण्याचे काम सोपे नव्हते. अफगाणिस्तान तालिबानने ताब्यात घेतल्याने या मोहिमेत अनेक अडसर होते. भारताला त्यासाठी मुत्सद्देगिरी आणि सुरक्षा या दोन्ही स्तरावर डावपेच खेळावे लागले.

भारताने आतापर्यंत ७३० नागरिकांना भारतात आणले आहे. अफगाणी शीख आणि हिंदू नागरिकांचाही यात समावेश आजही १४६ जणांना आणण्यात आले आहे. काही जणांना यापूर्वीच काबूलहून कतारला हलविण्यात आले होते. भारतात आलेल्या एका नागरिकाने सांगितले, की अफगाणिस्तानात आता भीती सोडली, तर दुसरे काही राहिले नाही. तिथे तालिबान्यांचे सरकार स्थापन होईल. त्यामुळे शांतताप्रिय लोकांना सुरक्षित राहायचे असेल, तर त्यांनी तेथून बाहेर पडले पाहिजे.

146 Indians back in country

महत्त्वाच्या बातम्या