अ‍ॅँजेलिना ज्योलीचा संताप, अफगणिस्थानमधून सैन्य या पध्दतीने मागे घेणे अमेरिकेसाठी लज्जास्पद


विशेष प्रतिनिधी

लॉस एंजेलिस: अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त करत आपण अमेरिकन असल्याची लाज वाटते असे प्रसिध्द अभिनेत्री अ‍ॅँजेलिना ज्योली हिने म्हटले आहे. अमेरिकेने सैन्य मागे घेतल्याने अफगणिस्थान तालिबानच्या हाती पडले आहे. अफगणिस्थानातील घडामोडींवर हस्तक्षेप करण्याची आपली ताकद अमेरिकेने गमावली आहे. अमेरिकेसाठी हे लज्जास्पनद असल्याचेही तिने म्हटले आहे.Angelina Jolie’s outrage, military withdrawal from Afghanistan shameful for US

अ‍ॅँजेलिनाने एका अमेरिकेन मासिकात लेख लिहिला असून त्यामध्ये म्हटले आहे की, अफगाणिस्तानच्या युद्धाबद्दल तुमची मते काहीही असोत पण आपण सगळे कदाचित एका गोष्टीवर सहमत असू. हे युध्द अशाप्रकारचे संपायला नको होते. अफगाण सरकार आणि तालिबान यांच्यातील शांतता कराराची कल्पना सोडून देणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे होते.



आपल्या सहकाºयांना आणि समर्थकांनाअशाप्रकारे अराजकाचा सामना करण्यासाठी सोडून देणे म्हणजे इतक्या वर्षांच्या त्यांच्या बलिदानाचा अपमान आहे. आपण त्यांचा विश्वासघात केला आहे. हे अपयश पचविणे आपल्यासाठी अत्यंत अवघड आहे.

अफगणिस्थानातील महिलांबाबत चिंता व्यक्त करताना अ‍ॅँजेलिना म्हणाली, महिलांशी गैरवर्तन करण्याचा तालीबानचा इतिहास आहे. मुलींना शाळेत जाण्यास बंदी घालणे, स्त्रियांना घरात बंदिस्त करणे आणि महिलांना सार्वजनिक ठिकाणी मारहाणीसह क्रूर शारीरिक शिक्षा देणे हे सहन करण्याच्या पलीकडे आहे. या महिलांचे आणि अफगणिस्थानातील नागरिकांचे संरक्षण करण्याची कोणतीही रणनिती आता अमेरिकेकडे नाही.

जोली पुढे म्हणाले की, अफगाणिस्तानातून अमेरिकेने माघार घेतल्याने निर्वासितांचे नवीन सदंकट निर्माण झाले आहे. मे महिन्यापासून अफगणिस्थानातील एक चतुर्थांश नागरिक विस्थापित झाले आहेत. त्यातील 80 टक्के महिला आणि मुली आहेत.

Angelina Jolie’s outrage, military withdrawal from Afghanistan shameful for US

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात