झारखंडमधील न्यायाधिशांच्या हत्येची सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – झारखंडमध्ये धनबाद येथे न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्याप्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली असून न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांकडून याबाबतचा स्थिती अहवाल मागविला आहे.Supreme court take cognizance about death

त्यांना यासाठी आठवडाभराचा अवधी देण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांनी आपण जाणीवपूर्वक न्या. आनंद यांना धडक दिल्याची कबुली दिली आहे.न्या. आनंद हे २८ जुलै रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना भरधाव वेगातील ऑटो रिक्षाने धडक दिली होती, या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या न्या. आनंद यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

सध्या झारखंड उच्च न्यायालय देखील या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून असून हा न्यायालयीन पातळीवरील तपास भविष्यात सुरूच राहील असे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी म्हटले आहे. आम्ही स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतो आहोत

असे सांगतानाच सरन्यायाधीशांनी देशभरात वैधानिक अधिकारी आणि न्यायाधीशांवर हल्ले होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. अशा घटनांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जायला हवे असे आमचे स्पष्ट मत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

Supreme court take cognizance about death

महत्त्वाच्या बातम्या