बिहारी गुंडा म्हणणाऱ्या महुआ मोईत्रा यांच्यावर तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला संताप


विशेष प्रतिनिधी

पाटणा : भारतीय जनता पक्षाच्या खासदाराला बिहारी गुंडा असे म्हणणाºया तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी संताप व्यकत केला आहे. या वक्तव्यामुळे मी व्यथित झाले असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.Tejaswi Yadav expresses anger over Mahua Moitra statementof Bihari goonda

तृणूमल कॉँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आपल्याला बिहारी गुंडा म्हणून हिणविल्याचा आरोप भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. यावर बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, अशा प्रकारचे वक्तव्य करणे अयोग्य आहे.



बिहार ही लोकशाहीची जन्मभूमी आहे. बिहारला वैभवशाली इतिहास आहे. राष्ट्रभारणीमध्ये बिहारने केलेले काम अद्वितिय आहे. त्यामुळे महुआ मोईत्रा यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे.

यावरून तृणमूल कॉँग्रेसशी असलेली युती तोडणार का? या प्रश्नावर तेजस्वी यादव म्हणाले, ही तृणमूल कॉँग्रेसची अधिकृत भूमिका नाही. हे वक्तव्य ममता बॅनर्जींचे नाही तर महुआ मोईत्रा यांचे वैयक्तिक आहे.

माहिती तंत्रज्ञान (आयटी) संसदीय समितीच्या बैठकीत मोईत्रा यांनी दुबे यांना बिहारी गुंडा म्हटल्याचा आरोप आरोप खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. दुबे यांनी लोकसभेत बोलताना संपूर्ण आयुष्यात आपला असा अपमान कधी झाला नव्हता, असे म्हटले आहे.

ते म्हणाले, या सभागृहाच्या सर्व सदस्यांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. खासदार म्हणून हे माझे तेरावे वर्ष आहे. माझ्या आयुष्यात अशा प्रकारे हिणविले गेले नाही. त्याचे कारण तरी काय? आमचा दोष काय? आमचा दोष हाच की आम्हाला या देशाचा विकास करायचा आहे.

आम्ही मजूर म्हणून काम केले आहे, हिंदी भाषिक लोक म्हणून, उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशातील असो आम्ही कठोर परिश्रम केले आहेत. आम्ही भगवान राम यांच्याकडून धडे शिकलो आहोत. हा बिहारच्या अभिमानावर हल्ला आहे.

दुबे म्हणाले, तृणमूल कॉँग्रेसला सर्वच हिंदी भाषिकांची अ‍ॅलर्जी आहे. म्हणूनच त्यांनी मला ‘बिहारी गुंडा’ म्हटले. हा बिहारच्या अभिमानावर हल्ला आहे. त्यांनी माझी माफी मागावी.

निशिकांत दुबे यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग करत एक ट्विट पोस्ट केले आहे. तुमच्या खासदाराने ज्या प्रकारे बिहार गुंडा या शब्दांचा वापर करून मला शिवीगाळ केली त्यातून तुमच्या पक्षाचा उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिक लोकांबद्दल द्वेष देशासमोर उघड झाला आहे.

Tejaswi Yadav expresses anger over Mahua Moitra statementof Bihari goonda

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!