विशेष प्रतिनिधी
पुणे : साजुक तुपातली बिर्याणी फुकटात मागविणाऱ्या पुण्यातील एका महिला आयपीएस अधिकाºयाची ऑ डिओ क्लिप व्हायरल होत आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.Female IPS officer wants Biryani for free,Home Minister Dilip Walse-Patil orders probe into female IPS officer,
मात्र, एका दुसऱ्या महिला पोलीस उपायुक्ताने ही ऑ डिओ क्लिप व्हायरल केली असल्याचा आरोप या आयपीएस अधिकाºयाने केला आहे.ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली महिला आयपीएस अधिकारी पुणे शहर पोलीस दलात वरिष्ठ पदावर कार्यरत आहे.
त्यांचे पती आयएएस अधिकारी असून राज्यातील एका महत्वाच्या पदावर पुण्यात कार्यरत आहेत. गुरूवारपासूनच यासंदर्भातली एक फोन ऑ डिओ क्लिप ही व्हायरल झाली आहे. या फोन रेकॉर्डिंगमध्ये आयपीएस अधिकारी असलेल्या डीसीपी मॅडम त्यांच्या कर्मचाऱ्या ला साजूक तुपातली बियार्णी आणण्यास सांगत आहेत.
प्रॉन्स, चिकन बियार्णी आणि स्टार्टर्स घेऊन ये. आपलाच एरिया आहे त्यामुळे पैसे देऊ देण्याची काय गरज? पीआयला सांग वगैरे असे उल्लेख यामध्ये आहेत. हा फोन पुणे डीसीपी यांच्या नावाने व्हायरल झाला आहे.
या प्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. वळसे-पाटील म्हणाले, ती व्हायरल क्लिप मी ऐकली आहे. नक्कीच गंभीर बाब आहे. आयुक्तांशी मी बोललो आहे. ते यासंदर्भातला अहवाल देतील. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईले.महिला पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाºयात झालेला हा संवाद व्हायरल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App