‘ॲमेझॉन’च्या बाजूने सुप्रिम कोर्टाचा कौल, रिलायन्स- फ्युचर व्यवहाराला जबर धक्का


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – फ्युचर रिटेल लिमिटेड या उद्योगसमूहाच्या रिलायन्स रिटेलमधील विलिनीकरणासाठी झालेल्या २४ हजार ७३१ कोटी रुपयांच्या कराराला सर्वोच्च न्यायालयात ब्रेक लागला. न्यायालयाने ई-मर्समधील अमेरिकास्थित आघाडीची कंपनी ॲमेझॉनच्या बाजूने निकाल देताना सिंगापूरमधील आपत्कालीन लवादाने या विलिनीकरणाच्या अनुषंगाने दिलेले आदेश हे भारतीय कायद्याअंतर्गत वैध आणि येथे लागू होण्यासारखे असल्याचे स्पष्ट केले. न्या. आर.एफ.नरिमन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली.Supreme Court rules in favor of Amazon, hits Reliance-Futures deal

न्या. नरिमन म्हणाले, की ‘‘ दिल्ली उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने याआधी दिलेल्या आदेशांशी आम्ही सहमत आहोत. सिंगापूरमधील लवादाने ॲमेझॉनच्या बाजूने दिलेले आदेश हे भारतामध्ये देखील लागू होऊ शकतात असे म्हटले होते.’’

दरम्यान विलिनीकरणाच्या मुद्यावरून अॅमेझॉन डॉट कॉमची एन.व्ही इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्ज एलएलसी आणि फ्युचर उद्योग समूहांत जोरदार कायदेशीर संघर्ष निर्माण झाला होता. या मुद्यावरून ॲमेझॉनने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावताना सिंगापूरमधील लवादाचे आदेश येथे वैध असून त्यांची येथे अंमलबजावणी करणे शक्य असल्याचे म्हटले होते.

Supreme Court rules in favor of Amazon, hits Reliance-Futures deal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात