सीए परीक्षा : जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी RTPCRचा निर्णय मागे, सुप्रीम कोर्टाचे Opt-Out Scheme चे आदेश

supreme court orders icai to issue opt out scheme for ca exams in july 2021

Opt-Out Scheme : सीए परीक्षा 2021 साठी बसणाऱ्या परीक्षर्थींसाठी opt-out पर्याय देण्याचे सुप्रीम कोर्टाने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाला आदेश दिले आहेत. सीएची परीक्षा 5 जुलैपासून सुरू होणार आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी अथवा कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची ची लागण झाली असल्यास अधिकृत डॉक्टरांकडून मेडिकल सर्टिफिकेट दाखवून ते परीक्षा देणे टाळू शकतात, असेही कोर्टाने म्हटले आहे आयसीएआयने विद्यार्थ्यांना RTPCR टेस्ट बंधनकारक केली होती, तथापि, कोर्टाने ही अटही मागे घेतली आहे. supreme court orders icai to issue opt out scheme for ca exams in july 2021


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सीए परीक्षा 2021 साठी बसणाऱ्या परीक्षर्थींसाठी opt-out पर्याय देण्याचे सुप्रीम कोर्टाने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाला आदेश दिले आहेत. सीएची परीक्षा 5 जुलैपासून सुरू होणार आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी अथवा कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची ची लागण झाली असल्यास अधिकृत डॉक्टरांकडून मेडिकल सर्टिफिकेट दाखवून ते परीक्षा देणे टाळू शकतात, असेही कोर्टाने म्हटले आहे आयसीएआयने विद्यार्थ्यांना RTPCR टेस्ट बंधनकारक केली होती, तथापि, कोर्टाने ही अटही मागे घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एएम खानविलकर, दिनेश महेश्वरी आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठापुढे आज सीए परीक्षावरील सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने SOPवर प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, खंडपीठाला ही SOP योग्य न वाटल्याने ICAIला यात बदल करण्यास सांगण्यात आले आहे.

कशी आहे Opt-out Scheme?

  • स्वत:ला किंवा कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाल्यास अधिकृत डॉक्टरांचे सर्टिफिकेट सादर करून विद्यार्थी परीक्षा देणे टाळू शकतात. तसंच हा प्रयत्न म्हणून गणला जाणार नाही. पुढे नोव्हेंबरमध्ये त्यांना परीक्षा देता येईल.
  • या परिस्थितीत परीक्षार्थींना जुना आणि नवा कोर्स 2021 मध्ये रिपीट करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • Opt-outसाठी परीक्षार्थीना RTPCR टेस्ट रिपोर्ट सादर करण्याची गरज नाही.
  • शेवटच्या क्षणी परीक्षा केंद्रात बदल करण्याच्या ICAIच्या मुद्दाला खंडपीठाने नकार दिला आहे.
  • परीक्षांच्या नियमांमध्ये बदल न करण्याचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. याचवेळी opt-out हा पर्याय विद्यार्थ्यांना विनाकारण वापरता येणार नसल्याचेही कोर्टाने सांगितले आहे.
  • दरम्यान, सीएच्या अंतिम परीक्षा 5 ते 19 जुलैदरम्यान होणार आहेत. तर CA Inter परीक्षा 6 जुलै आणि CA Foundation परीक्षा 20 जुलै रोजी होणार आहे.

supreme court orders icai to issue opt out scheme for ca exams in july 2021

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात