पुनि पुनि कितने हो सुने सुनाये, हिये की प्यास बुझत ना बुझाये : सौदी अरेबियाच्या शालेय अभ्यासक्रमात ‘रामायण’ ; ‘लक्ष्मण’ सुनील लहिरी म्हणतात ‘ हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण’


रामायणाची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर जगभर पोहोचली आहे.आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाच उत्तर म्हणजे रामायण, महाभारत आणि भगवत् गीता। Sunil Lahri has excited response as Saudi Arabia incorporates ‘Ramayan’ in school syllabus


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सौदी अरेबियाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. नवीन अभ्यासक्रमात सौदी अरेबियाने रामायण आणि महाभारताचा समावेश केला आहे. सौदी अरेबियाच्या प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी व्हिजन 2030 अंतर्गत शिक्षण क्षेत्रासाठी इतर देशांच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा अभ्यास करण्याचे अनिवार्य केले आहे.

देशात नवीन शैक्षणिक धोरणाची घोषणा करताना विद्यार्थ्यांना रामायण व महाभारतही शिकवले जाईल, असे त्यांनी सांगीतले . शिक्षण धोरणामधील या बदलातील हा अभ्यासक्रम योग आणि आयुर्वेद या जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या भारतीय संस्कृतींवर केंद्रित असेल.



‘रामायण’ आणि ‘महाभारत’ महाकाव्य अनेक शतकांपासून वाचले जात आहेत. तथापि, आता सनातन धर्माच्या या पौराणिक कथांचा प्रभाव परदेशातही दिसून येतो आहे. सौदी अरेबियाच्या शाळांमधील सामाजिक विज्ञान अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्यात आला आहे आणि आता विद्यार्थी ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ विषयी अभ्यास करत आहेत.

रामायणामध्ये भगवान लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी यांनी या जागतिक सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करत मला रामायणाचा एक भाग असल्याचा अभिमान आहे असेही म्हंटले आहे.

.रामानंद सागर दिग्दर्शित शोमध्ये सुनील लाहिरीने लक्ष्मणाची बहुचर्चित व्यक्तिरेखा साकारली होती.
“ भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की सौदी अरेबियाने रामायणाला त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग बनवले आहे ”

सरकारच्या ‘सौदी व्हिजन 2030’ धोरणाचा हा एक भाग आहे ज्याद्वारे विविध धर्म आणि रीतिरिवाजांची विविधता आणि तत्त्वे शिकविली जात आहेत. केवळ ‘रामायण’च नाही, तर सौदी अरेबियाच्या शाळांमध्ये मुलांना महाभारत आणि गौतम बुद्ध देखील शिकवले जातात.

काही दिवसांपूर्वी सुनील लाहिरी यांनीही ‘रामायण’ शोच्या थीम पार्क संग्रहालयाच्या कल्पनेला पाठिंबा दर्शविला होता. ते म्हणाले की, लोक यास ‘अमर कथा’ म्हणून पाहतात यासह त्यांनी आपल्या चाहत्यांना कोणते भाग पहाण्यास उत्सुक असतील असे देखील विचारले होते.

‘रामायण’ हा टीव्ही शो मागील वर्षी प्रचंड यशस्वी झाला . कोरोना संकटाच्या वेळी सकारात्मक राहण्यास मदत देखील केली .महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी या शोने अनेक विक्रम केले.

Sunil Lahri has excited response as Saudi Arabia incorporates ‘Ramayan’ in school syllabus

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात