रश्मी शुक्ला यांनी ‘सीबीआय’ला मंत्र्यांच्या भ्रष्ट आचरणाची दिली माहिती?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पोलिस अधिकारी परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनाही साक्षीदार करण्याचा निर्णय ‘सीबीआय’ने घेतला आहे. त्यामुसार सीबीआय हैदराबाद येथे त्यांचा जबाब नोंदवला. CBI enquires Rashmi Shukla

दरम्यान, आज भाजपनेते अतुल भातखळकर यांनी रश्मी शुक्ला यांनी ‘सीबीआय’ला मंत्र्यांच्या भ्रष्ट आचरणाची माहिती दिली असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान पोलिस बढती-बदलीबाबतच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी रश्मी शुक्ला यांना पोलिसांनी जबाबासाठी मुंबईत बोलावले आहे.सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या शुक्ला यांचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. तेथेच ‘सीबीआय’ने साक्ष नोंदवली आहे. महाराष्ट्रातील कोविड परिस्थितीमुळे मुंबईला येणे शक्य नसल्याचे रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. मात्र, आज महाराष्ट्रातून त्यांना ‘ईमेल’ पाठवण्यात आला असून २९ एप्रिल ते ४ मेच्या दरम्यान मुंबईतील निवासस्थानी जबाब देण्यासाठी हजर राहा, असे कळविण्यात आले आहे.

CBI enquires Rashmi Shukla

महत्त्वाच्या बातम्या