वृत्तसंस्था
चंदीगड : पंजाबमध्ये चरणजीत सिंग चन्नी यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेऊन चार दिवस उलटून गेले, तरी अद्याप मंत्रिमंडळाचा पत्ता नाही. या मुद्द्यावरून अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी टोला हाणला आहे. Sukhbir Singh Badal asks newly-appointed Punjab CM Charanjit Singh Channi “to not let extra-constitutional super CM to treat him as a dummy and rubber stamp
चेन्नी साहेब, तुम्ही पंजाबचे मुख्यमंत्री आहात. तुमच्या डोक्यावर कोणा घटनाबाह्य मुख्यमंत्र्याला बसू देऊ नका. तुमचे अधिकार वापरा. पंजाबी जनतेचे कल्याण करा, असा सल्ला सुखबीर सिंग बादल यांनी दिला आहे.
Shiromani Akali Dal (SAD) chief Sukhbir Singh Badal asks newly-appointed Punjab CM Charanjit Singh Channi "to not let extra-constitutional super CM to treat him as a dummy and rubber stamp," suggests him to conduct himself befitting the dignity of the office he holds: SAD Office — ANI (@ANI) September 24, 2021
Shiromani Akali Dal (SAD) chief Sukhbir Singh Badal asks newly-appointed Punjab CM Charanjit Singh Channi "to not let extra-constitutional super CM to treat him as a dummy and rubber stamp," suggests him to conduct himself befitting the dignity of the office he holds: SAD Office
— ANI (@ANI) September 24, 2021
पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांना हटवून चरणजीत सिंग चन्नी यांची मुख्यमंत्रिपदी निवड केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू ज्या पद्धतीने “ओव्हर ऍक्टिव्ह” झाले आहेत, त्याला उद्देशून देखील सुखबीर सिंग बादल यांनी हा टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे सध्या आपल्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह पंजाबचा प्रशासकीय गाडा हाकत आहेत. मंत्रिमंडळासंदर्भात नुसत्याच चर्चा सुरू आहेत. काल रात्री दहा ते पहाटे दोन वाजेपर्यंत राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि केसी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा झाली. आजही मंत्रिमंडळाच्या नावांसंदर्भात चर्चा होते आहे. परंतु अंतिम निर्णय काही होत नाही, हा मुद्दा देखील सुखबीर सिंग बादल यांनी अधोरेखित केला आहे.
पंजाबमध्ये नेतृत्व बदल करून काँग्रेसने तिढा सोडविण्याऐवजी तो वाढविला आहे, असाच सुखबीर सिंग बादल यांच्या टीकेचा सूर आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App