मुस्लिमांवर टीका करतात म्हणून अबधाबी चार्टर्ड अकाऊंटन्टसमधील वक्त्यांमधून सुधीर चौधरींचे नाव हटविले, राज्यकन्येनेच घेतला होता आक्षेप


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मुस्लिमांवर टीका करतात म्हणून अबधाबी चार्टर्ड अकाऊंटन्टसमधील वक्यांमधून झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरींचे नाव हटविले आहे. सुंयक्त अरब अमिरातीच्या राज्यकन्येनेच त्यांच्या नावाला आक्षेप घेतला होता. राजकन्येने चौधरी यांना ‘असहिष्णू’ आणि ‘दहशतवादी’ म्हटले आहे.Sudhir Chaudhary’s name was removed from the list of speakers in Abudhabi Chartered Accountants for criticizing Muslims, The objection was taken by the princess herself

‘झी न्यूज’चे संपादक आणि पत्रकार सुधीर चौधरी यांचं नाव ‘अबू धाबी चार्टर्ड अकाऊंटन्टस’ कार्यक्रमातील वक्त्यांच्या यादीत होते. या कार्यक्रमात वक्ते म्हणून सहभागी होण्यास सुधीर चौधरी यांनी होकार दिला होता. या कार्यक्रमात त्यांच्या नावाचा समावेश समोर आल्यानंतर संयुक्त अरब अमिरातच्या राजकन्या हेंड बिंत ए फैसल अल कासिम यांनी यावर कठोर शब्दांत आक्षेप व्यक्त केला होता.



राजकन्या कासिम यांनी त्यांचा उल्लेख ‘असहिष्णू’ आणि ‘दहशतवादी’ म्हणून केला होता. त्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांकडून चौधरी यांचं नाव हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
एक अँकर रात्रंदिवस मुस्लिमांचा अपमान करतो, आणि त्यालाच आपल्या देशात बोलण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी बोलावलं जातं’ असं म्हणत कासिम यांनी चौधरी आणि आयोजकांना सुनावले होते.

सुधीर चौधरी यांना खोट्या बातम्या देणं, इस्लामोफोबिक आणि जातीय द्वेष, डॉक्टरिंग ट्रिप इत्यादी तयार करण्याचा आणि त्यांचा प्रसार करण्याचा आरोप आहे. एका अप्रमाणिक पत्रकाराला मंचावर आणि प्रेक्षकांसमोर आमंत्रित करून आपली प्रतिष्ठा आणि सन्मान पातळी खाली घसरवयाला हवी का? असा प्रश्नही राजकन्येने आयोजकांना विचारला होता.

सुधीर चौधरी आपल्या इस्लामोफोबिक कार्यक्रमासाठी ओळखले जातात तसंच भारतातील २० कोटी मुस्लिमांना निशाणा बनवतात. देशभरात मुस्लिमांविरोधात होणाऱ्या हिंसाचारात त्यांच्या अनेक प्राईम टाईम कार्यक्रमाचं थेट योगदान आहे, असं म्हणत राजकन्येनं सुधीर चौधरी यांच्यावर टीका केली होती. तसंच ‘यूएईमध्ये द्वेषयुक्त भाषणाद्वारे कोणत्याही धमार्ला किंवा वंशाला लक्ष्य करणं हा कायदेशीर गुन्हा’ असल्याची आठवणही त्यांनी आयोजकांना करून दिली.

यानंतर दुसºयाच दिवशी ‘इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड अकाऊंटन्टस ऑफ इंडिया’ला अबू धाबीच्या सदस्यांनी धाडलेलं एक पत्र जाहीर करत त्यांनी सुधीर चौधरींचं नाव ‘अबू धाबी चार्टर्ड अकाऊंटन्टस’च्या वक्त्यांतून वगळण्यात आल्याची माहिती दिली आहे.

Sudhir Chaudhary’s name was removed from the list of speakers in Abudhabi Chartered Accountants for criticizing Muslims, The objection was taken by the princess herself

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात