मतदानाला गालबोट, ममतांविरुद्ध उभे भाजप उमेदवार शुभेंदु अधिकारींच्या ताफ्यावर हल्ला, तृणमूलच्या 200 कार्यकर्त्यांवर आरोप

Subhendu Adhikari's convoy Attacked on Voting Day in Nandigram

Subhendu Adhikari’s convoy Attacked : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील हॉटसीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदीग्राममध्ये भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या मतदानादरम्यान ते एका मतदान केंद्रावर गेले आणि तेथून परतत असताना त्यांच्या ताफ्यावर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. Subhendu Adhikari’s convoy Attacked on Voting Day in Nandigram


विशेष प्रतिनिधी

नंदीग्राम : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील हॉटसीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदीग्राममध्ये भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या मतदानादरम्यान ते एका मतदान केंद्रावर गेले आणि तेथून परतत असताना त्यांच्या ताफ्यावर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. या हल्ल्यात शुभेंदू अधिकारी बचावले असले तरी त्यांच्यासोबत असलेल्या काही माध्यमांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यासंदर्भात शुभेंदू अधिकारी म्हणाले की, हे काम विशिष्ट समाजातील लोकांच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, देशातील कोणत्याही राज्यात असा हिंसाचार होत नाही. ते म्हणाले की, बंगालला बांगलादेश बनवण्याचा कट रचला जात आहे. टीएमसी एका विशिष्ट समुदायाला फूस लावून राजकीय हिंसाचार घडवत आहे. दिलीप घोष म्हणाले की, ही आरपारची लढाई असून यावेळी टीएमसीचा सफाया निश्चित आहे. शुभेंदू अधिकारी म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये जंगलराज सुरू आहे. जय बांग्लाच्या घोषणा देऊन हा हल्ला करण्यात आला. ही घोषणा बंगालची नसून बांगलादेशची आहे. पश्चिम बंगालला बांगलादेश बनवण्याची तयारी सुरू आहे.

Subhendu Adhikari’s convoy Attacked on Voting Day in Nandigram

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था