lockdown issue | कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसत आहे… कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे… असे असताना राज्यात लॉकडाऊनच्या (lockdown issue) बाबतीत मात्र सर्वच पक्षांची भूमिका वेगवेगळी असल्याचे दिसत आहे… लॉकडाऊनला पक्ष विरोध करत असल्याने सत्ताधारी शिवसेनेचा संताप समोर येत आहे. विशेष म्हणजे विरोधातील भाजपबरोबरच सत्तेत असलेल्या पक्षांनीही लॉकडाऊनला विरोध केलाय त्यामुळे भाजपच्या हाती टीकेची आयती संधी आली आहे. त्यामुळं शिवसेनेनं मात्र त्यांची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडली आहे. विरोधात असलेल्या भाजपनं तर शिवसेनेला अगदी सत्तेच्या पहिल्या दिवसापासून धारेवर धरलंच आहे, पण आता लॉकडाऊनच्या मुद्दयावरून सरकारमधील पक्षांमध्येच एकवाक्यता नसल्याचं दिसतंय आणि त्यामुळं हे संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर बनलंय. Rift between Aghadi goverment in maharashtra over lockdown issue
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App