Subhash Chandra Bose : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडिया गेटवरील थ्रीडी प्रतिमेचं नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन


  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा राजा पंजम जॉर्ज याचा पुतळा असणाऱ्या मेघडंबरीमध्ये बसवला जाणार आहे. 1968 मध्ये पंचम जॉर्ज यांचा पुतळा हटवण्यात आला होता. त्यावेळीपासून ती मेघडंबरी रिकामी होती.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली येथील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.  Subhash Chandra Bose: Narendra Modi inaugurates 3D image of Netaji Subhash Chandra Bose at India Gate

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. केंद्र सरकारनं सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस साजर करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. नेताजी बोस यांची जयंती यावर्षीपासून पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाणार आहे.



आज संसदेत सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली येथील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.

नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचा फोटो देखील जारी केला होता. जोपर्यंत पुतळा तयार होत नाही तोपर्यंत नेताजी बोस यांची होलोग्राम स्वरुपातील प्रतिमा तिथं असेल. नरेंद्र मोदी आज त्या प्रतिमेचं अनावरण करणार आहेत. होलोग्राफिक हे डिजीटल तंत्र आहे. हे प्रोजेक्टर सारखं काम करतं. यामध्ये कोणतिही गोष्टी थ्रीडी स्वरुपात दाखवता येते. आपण समोर पाहत असलेली गोष्ट खरी असल्याचा भास होतो पण आपण थ्री़डी इमेज पाहत असतो.

Subhash Chandra Bose : Narendra Modi inaugurates 3D image of Netaji Subhash Chandra Bose at India Gate

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात