मिनिमम बॅलन्स नसल्याच्या कारणावरून PNB बँकेने कमावले कोट्यावधी रुपये


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: एका आरटीआय मधील माहितीनुसार पंजाब नॅशनल बँकेने २०२०-२१ मध्ये ग्राहकांकडून मिनिमम बॅलन्स नसल्याने दंड वसूल केला आहे. खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. तो न ठेवल्याबद्दल बँकेने ग्राहकांना दंड केला आहे. यावर्षी सदर दंडाची रक्कम १७० कोटी इतकी झाली आहे. सदरप्रमाणे शुल्क आकारण्यात आले व बँकेचा नफा २०१९ -२० मध्ये २८६.२४ कोटी रुपये इतका होता. मिनिमम बॅलन्स वरील सदर दंड तिमाही आधारित आकारण्यात येतो.

Stating the reason of minimum balance, PNB bank earns in crores in FY21

एप्रिल ते जून २०२१ या तिमाहीत शिल्लक रकमेवरील सरासरी दंड ३५.४६ कोटी रुपये होता. २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत अशा प्रकारचे शुल्क आकारण्यात आले नव्हते. ही माहिती मध्यप्रदेशचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांचेकडून मागवण्यात आली होती. तिसर्‍या आणि चौथ्या तिमाहीत ४८.११ व ८६.११ कोटी रुपये इतकी रक्कम आकारली आहे. यावर्षी बँकेची एटीएम व्यवहारांवर कमाई ७४.८ कोटी रुपये इतकी आहे. २०१९-२० या वर्षात एटिएम व्यवहारातून कमाई ११४.०८₹ इतकी होती. एटिएम शुल्क २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत माफ करण्यात आले होते. ३० जुन २०२१ पर्यंत पंजाब नॅशनल बॅंकेतील ४,२७,५९,५९७ खाती निष्क्रिय तर १३,३७,४८,८५७ इतकी खाती सुरू होती.

Stating the reason of minimum balance, PNB bank earns in crores in FY21

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण