राज्यात उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा; पारा ४१ अंशांच्या पुढे, देशात उष्णतेची लाट


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राज्यात उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा लागत असून अनेक ठिकाणी पारा ४१ अंशांच्या पुढे गेला आहे.देशात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. State of summer heat and sweat; Above 41 degrees Celsius, heat wave in the country

देशातील ७० टक्के भागांत उष्णतेची लाट असून ८० टक्के लोकसंख्या होरपळत आहे. बुधवारी ३३ शहरांत तापमान ४४ अंशाच्या वर होते. यात ७ शहरांत तापमान ४५ अंशाहून अधिक होते. दरम्यान, महाराष्ट्रात २५ हून अधिक शहरांत पारा ४१ अंशाच्या वर आहे ब्रह्मपुरी आणि वर्धा शहरांत तपमान ४५ अंशावर होते.

उष्णतेच्या लाटेचा इशारा

भारतीय हवामान विभागाने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. मात्र, विदर्भामध्ये सर्वात जास्त उन्हाची तीव्रता राहणार असल्याचे सांगितले. आगामी आठवडाभर राज्यात उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून कमाल तापमानाचा पारा चढता राहणार आहे.



देशात रविवार ठरणार उष्णवार

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, झारखंड या राज्यांत एप्रिलच्या अखेरच्या तीन दिवसांत तापमान वाढते राहील. १ मे रोजी उष्णतेच्या लाट वाढणार आहे. अनेक भागांत तापमान ४७-४८ अंशावर राहील.

State of summer heat and sweat; Above 41 degrees Celsius, heat wave in the country

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात