प्रधानमंत्री संग्रहालय : नेहरू – गांधी परिवार सोडून सर्व पंतप्रधानांच्या परिवारांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आज 14 एप्रिल महावीर जयंती, बैसाखी, रंगोली बिहू, तमिळ नववर्ष आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्व 18 पंतप्रधानांच्या स्मृतीचे संग्रहालय देशाला लोकार्पित केले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थान तीन मूर्ती भवन याच्या परिसरात बांधलेले प्रधानमंत्री संग्रहालय पंतप्रधान मोदींनी देशाला समर्पित केले. या भव्य समारंभात सर्व पंतप्रधानांच्या कुटुंबीयांना आणि परिवाराला आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते. हे सर्व कुटुंबीय आणि परिवार या कार्यक्रमाला उपस्थित होते… पण याला अपवाद होता, नेहरू – गांधी परिवाराचा…!! नेहरू – गांधी परिवारातील कोणीही विद्यमान सदस्य प्रधानमंत्री संग्रहालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. Speaking at the inauguration of Pradhanmantri Sangrahalaya in Delhi

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन झाल्यानंतर संबंधित संग्रहालया विषयी एक प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. तीन मूर्ती भवन परिसरात बांधलेल्या या संग्रहालयात पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्व पंतप्रधानांचे योगदान, त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे निर्णय, वैशिष्ट्ये, पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तू या सर्व गोष्टींचे पारंपारिक आणि आधुनिक पद्धतीने प्रदर्शन मांडण्यात आले आहे.

स्वातंत्र्यलढ्याच्या सुरुवातीपासून देश घटनात्मक पद्धतीने वाटचाल करू लागण्या पर्यंतचा प्रवास एका दालनात मांडण्यात आला आहे. संग्रहालयात एकूण 42 दालने असून त्यामध्ये प्रत्येक पंतप्रधानांच्या विशेष योगदानाविषयी विशेष उल्लेख करण्यात आले आहेत.

या कार्यक्रमाला पंडित नेहरू, गुलझारीलाल नंदा, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, पी. व्ही. नरसिंहराव, चंद्रशेखर, एच. डी. देवेगौडा, अटल बिहारी वाजपेयी, इंद्रकुमार गुजराल, डॉ. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या सर्व पंतप्रधानांच्या नातेवाईकांना खास निमंत्रण देण्यात आले होते. परंतु नेहरू – गांधी परिवाराचा अपवाद वगळता सर्व पंतप्रधानांचे नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात भारतीय लोकशाही परंपरेचा खास गौरव केला.

Speaking at the inauguration of Pradhanmantri Sangrahalaya in Delhi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात