भारत-पाकच्या सैनिकांनी तब्बल तीन वर्षांनी वाटली एकमेकांना मिठाई, शस्त्रसंधीमुळे ईद केली साजरी


वृत्तसंस्था

श्रीनगर : तब्बल तीन वर्षांनंतर ईदनिमित्त भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकांनी बुधवारी सीमेवर मिठाईची देवाणघेवाण केली. २०१९ नंतर प्रथमच हा असा कार्यक्रम पार पडला. Soldjers exchange sweets

ईदनिमित्त असा कार्यक्रम सीमेवरील उभय देशांच्या सैनिकांमधील मुख्य उत्सव मानला जातो. २०१९ मध्ये पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४० जवान दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झाले. त्यानंतर गेली दोन वर्षे हा कार्यक्रम झाला नव्हता.



यंदा फेब्रुवारीपासून उभय देशांच्या सैनिकांनी शस्त्रसंधीच्या कराराचे काटेकोर पालन केले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.
लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार कुपवाडा जिल्ह्यातील कृष्णगंगा नदीच्या किनाऱ्यावरील तिथवाल क्रॉसिंग, उडी येथील कमान अमन सेतू आणि पूँच-रावळकोट क्रॉसिंग पॉइंट येथे हे कार्यक्रम पार पडले. त्यावेळी उभय देशांच्या सैनिकांनी त्यांचे राष्ट्रध्वजही बरोबर आणले होते.

Soldjers exchange sweets

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात