ब्लॅक फंगसवरील इंजेक्शनच्या उत्पादन, आयतीसाठी सहा कंपन्यांना परवानगी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचे उत्पादन आणि आयात करण्याची परवानगी देशातील सहा कंपन्यांना सरकारने दिली आहे. Six companies allowed To Produced or procure The Injection Of black fungus.

कोरोनापाठोपाठ ब्लॅक फंगसचे रुग्ण देशात वाढू लागले आहेत. आतापर्यत 8 हजार 888 जणांना हा आजार झाला आहे. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीला विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तीला आजाराचा धोका अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.ब्लॅक फंगस अर्थात म्युकरोमायकोसिस हा एक प्रकारचा बुरशीजन्य आजार आहे. कोरोना असताना रुग्णाला स्टेरिओईड दिल्यामुळे हा आजार बळावत असून तो मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला होतो आहे, असे स्पष्ट झाले आहे.

आता या आजारावर उपयोगी पडणारे Liposomal amphotericine B हे इंजेक्शन उत्पादन आणि आयात करण्याची परवानगी सहा कंपन्यांना दिली आहे.

परवानगी दिलेल्या कंपन्यांची नावे

  • भारत सीरम अँड वैक्सीन लिमिटेड
  • बीडीआर फार्मास्युटिकल्स लिमिटेड
  • सन फार्मा लिमिटेड
  • सिपला लिमिटेड
  • लाइफ केयर इनोवेशन
  • माईलॅन लॅब्स (आयात करणार)

Six companies allowed To Produced or procure The Injection Of black fungus.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था