वृत्तसंस्था
शांघाय : चीनमध्ये कोरोना संकट वाढत चालले आहे. राजधानी बीजिंगमध्ये दुकाने रिकामी असून शांघायमध्ये एका दिवसात ५१ जणाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे कोरोना चाचणीसाठी नागरिकाच्या रांगा लागत आहेत. Shops empty in Beijing, one in Shanghai 51 deaths a day, queues for corona testing
ओमायक्रॉन व्हेरिएंटने शांघायच्या सामान्य लोकांना त्रस्त केले आहे. आता बीजिंगमध्येही संसर्ग आणि लॉकडाऊनची भीती स्पष्ट दिसत आहे. कोरोना चाचणीसाठी रांगा लागल्या आहेत. लॉकडाऊनच्या भीतीने सामान खरेदी करण्यासाठी स्टोअर आणि मॉलमध्ये रांगा लागल्या आहेत.
साठेबाजीमुळे दुकाने सातत्याने रिकामी होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंसाठी लोक दूर जाऊनही खरेदी करण्यास हतबल आहेत. सोमवारी सरकार म्हणाले, शुक्रवार ते आतापर्यंत कोरोनाचे ७० रुग्ण आढळले. शांघायमध्ये एका दिवसात ५१ मृत्यू झाल्यानंतर बीजिंगमध्ये गोंधळाची स्थिती आहे. अनेक जिल्ह्यांत चाचणी अहवालाशिवाय ट्रेन किंवा विमान प्रवासावर बंदी घातली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App