SHOCKING NEWS Pandora papers: ६०० पत्रकारांचे sting operation ! परदेशात संशयास्पद आर्थिक गैरव्यवहार ; पँडोरा पेपर्स प्रकरणात सचिन तेंडुलकर-जॅकी श्रॉफचे नाव


पँडोरा पेपर्समधील माहितीनुसार, जगातील अनेक राजकारण्यांचीही परदेशात संपत्ती आहे. यामध्ये भारतातील सहा,तर पाकिस्तानमधील सात राजकारण्यांचा समावेश आहे. | Sachin Tendulkar Pandora Papers leak SHOCKING NEWS Pandora papers: 600 journalists sting operation! Suspected financial malpractice abroad; Name of Sachin Tendulkar-Jackie Shroff in Pandora Papers case


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरातील मातब्बर राजकारणी, धनाढ्य उद्योगपती आणि सेलिब्रीटीजनी कर चोरी करण्यासाठी काही देशांमध्ये अवैध गुप्त गुंतवणूक केल्याची माहिती पँडोरा पेपर्स लीकमधून समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

जगभरात गाजलेल्या पनामा पेपर्स लीक प्रकरणानंतर आता जगातील धनाढ्यांना परदेशात केलेली गुंतवणूक उघड करणारी कागदपत्रे समोर आली आहेत. जगातील 117 देशांच्या 600 पत्रकारांनी केलेल्या पँडोरा पेपर्स या शोध मोहिमेत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचे नाव असल्याचीही माहिती आहे. सचिन तेंडुलकरसह जगातील अनेक सेलिब्रिटींनी टॅक्स हेवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांमध्ये विविध माध्यमांतून पैसा गुंतवल्याची माहिती समोर आली आहे. यात सचिन तेंडुलकर, अनिल अंबानी व कॉंग्रेसचे नेते सतीश शर्मा आदींची नावे आहेत.

इंटरनॅशनल कन्सोर्टीयम ऑफ इन्व्हेस्टीगेटीव्ह जर्नालिस्ट या जगविख्यात संस्थेने पँडोरा पेपर्स या नावाने करचोरी करून अवैध पध्दतीत गुंतवणुकीता गौप्यस्फोट ताज्या लीकमधून केलेला आहे. यात तब्बल १ कोटी २० लाख डॉक्टुमेंटचा समावेश असून हा एकत्रीत डेटा सुमारे २.९४ टेराबाईट इतका आहे. यात जगभरातील मातब्बर राजकारण्यांसह सेलिब्रिटीजचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात सचिन तेंडुलकर, अनिल अंबानी, कॉंग्रेसचे दिवंगत नेते सतीश शर्मा आणि कार्पोरेटी लॉबीस्ट नीरा राडिया यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांनी करमाफी वा कर सवलत असणार्‍या देशांमध्ये गुप्त गुंतवणूक केल्याचा दावा करण्यात आला आहे.



पँडोराा पेपर्सचा भाग असलेल्या पनामातील अल्कोगाल या लॉ फर्ममधील तपासाच्या रेकॉर्डमध्ये सचिन, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि सासरे आनंद मेहता यांची बीव्हीआयमधील सास इंटरनॅशनल लि. या कंपनीचे बीओ व संचालक म्हणून नावे आहेत. कंपनीच्या अवसायनाच्या वेळी तिचे समभाग नोंदणीकृत किमतीसह समभागधारकांनी खालीलप्रमाणे पुन्हा खरेदी (बायबॅक) केले होते. यात सचिन तेंडुलकर त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि सासू सासर्‍यांकडील ९० समभागांची किंमत ८.४६ दशलक्ष पौंड (सुमारे ६० कोटी रुपये) इतकी असावी, असा अंदाज आहे. याबाबतची माहिती सचिनने राज्यसभा सदस्य म्हणून जाहीर केली नव्हती हे विशेष.

यासोबत, जगभरातील कुठल्याही कंपनीत आपली मालमत्ता किंवा उल्लेखनीय आर्थिक हितसंबंध नाहीत, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक अनिल अंबानी यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये सांगितले होते. तथापि, रिलायन्सचे एडीए समूहाचे अध्यक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या मालकीच्या किमान १८ परदेशी कंपन्या जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स व सायप्रस येथे असल्याचे पँडोरा पेपर्सच्या रेकॉर्डसमध्ये उघड झाले आहे. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा यांच्या परदेशात कंपन्या व मालमत्ता होत्या, असे पँडोरा पेपर्समध्ये दिसून आले आहे. तसेच या यादीत नीरा राडिया या कार्पोरेटी लॉबींग करणार्‍यांचेही नाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबत अभिनेता जॅकी श्रॉफ, ख्यातनाम महिला उद्योजिका किरण मुजूमदार शॉ, विनोद अडाणी आदींची नावे देखील यात असल्याचे अधोरेखील झाले असून यामुळे खळबळ उडाली आहे.

सचिन तेंडुलकरच्या वकिलांनी दावा फेटाळला-

या सगळ्या प्रकारानंतर सचिन तेंडुलकरच्या वकिलांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर यांची सर्व गुंतवणूक वैध मार्गाने केलेली आहे. आयकर विभागाला याविषयी माहिती देण्यात आली होती, असे वकिलांकडून सांगण्यात आले.

SHOCKING NEWS Pandora papers : 600 journalists sting operation! Suspected financial malpractice abroad; Name of Sachin Tendulkar-Jackie Shroff in Pandora Papers case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात