आर्यन खान याने ड्रग्सचं सेवन केलं होतं या आरोपाखाली त्याला NCB ने अटक केली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणात एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली. ती म्हणजे शाहरुख खान मुलगा आर्यन खान याने ड्रग्सचं सेवन केलं होतं. याबाबतचा उल्लेख एनसीबीने जारी केलेल्या अटकेच्या मेमोमध्ये करण्यात आला आहे. यासह इतरही वेगळ्या गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. AARYAN KHAN DRUGS CASE: Drug use by Aryan Khan at Cruise Party: NCB
NCB चे अधिक्षक विश्व विजय सिंग यांनी आर्यन खान याला अटकेचं मेमो बजावलं आहे. ज्यामध्ये आर्यनवर ड्रग्ज बाळगणे, त्याचं सेवन करणे तसेच इतर गुन्हे लावण्यात आले आहे. NDPS Act, 1985 अंतर्गत 3 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता आर्यनला अटक करण्यात आली. सेक्शन 20(b), 27, 35 NDPS Act अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, NCB ने या प्रकरणात 13 ग्राम कोकेन, 5 ग्राम MD, 21 ग्राम चरस आणि MDMA च्या 22 गोळ्या जप्त केल्यात. याशिवाय 1 लाख 33 हजार रुपयेसुद्धा जप्त करण्यात आले आहेत. कॉर्डेलिया क्रूझच्या जहाजावर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीने अतिशय हुशारीने छापा मारला होता. NCB अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला शनिवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलं होतं.
त्यानंतर अनेक तास चौकशी सुरु होती. अखेर दुपारी 2 वाजता आर्यनसह तीन जणांना अटक करण्यात आली होती. आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि दिल्लीतील फॅशन डिझायनर मुनमुन धमेचा या तिघांना एनसीबीकडून आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App