पुढच्या वर्षांपासून सिक्कीममध्ये बाटलीबंद पाणी विकण्यावर बंदी; प्लास्टिक बाटल्या होणार हद्दपार


वृत्तसंस्था

गंगटोक : पुढच्या वर्षांपासून सिक्कीममध्ये प्लास्टिकमधील बाटलीबंद पाणी विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.१ जानेवारी २०२२ पासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या राज्यातून इतिहास जमा होणार आहेत. Ban on sale of plastic bottled water in sikkim state from 1 January 2022

१ जानेवारी २०२२ पासून प्लास्टिकच्या बाटलीत पाणी विकण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे राज्य सरकारने पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे, असे मानले जाते.
सिक्कीमच्या अनेक भागात बांबूच्या बाटल्या वापरल्या जात आहेत. पर्यावरण वाचवण्यासाठी सिक्कीमचे हे पाऊल कौतुकास्पद ठरले आहे.

राज्यात अनेक नैसर्गिक स्त्रोत आहेत.ताजे आणि चांगल्या दर्जाचे पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे अशाच पाण्याचा वापर करण्यासाठी सरकार जनतेला प्रोत्साहित करणार आहे. बाटलीबंद प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात येणार आहे.- पी.एस. तमांग, मुख्यमंत्री, सिक्कीम

Ban on sale of plastic bottled water in sikkim state from 1 January 2022

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी