धक्कादायक! बुरखा न घालता जीन्स घातली म्हणून मुलीसोबत गैरवर्तन


विशेष प्रतिनिधी

बिस्वनाथ : आसाम राज्यातील बिस्वनाथ जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक मुस्लीम मुलीने बुरखा न घालता जीन्स टी शर्ट घालून दुकानात गेली असताना वयोवृद्ध दुकानदाराने तिच्यासोबत गैरवर्तणूक करून, तिला लज्जास्पद वागणूक देऊन हाकलून लावले. जर तिने बुरखा न घालता जीन्स वगैरे घातली तर माझ्या घरातील स्त्रियांवर वाईट परिणाम होतील, असे त्याचे म्हणणे होते.

Shocking! Mistreatment of girl as wearing jeans instead of Burakha

पीडित मुलगी आसाम राज्यातील बिस्वनाथ जिल्ह्यातील राहणारी आहे. मोबाइल फोन अॅसेसरीज दुकानामध्ये ती इयरफोन खरेदी करण्यासाठी गेली असताना, दुकानाचा मालक नूरुल अमीन यांने तिला इअर फोन देण्यास नकार दिला. आणि बुरखा ऐवजी जीन्स घातली म्हणून तिला भले वाईट बोलू लज्जास्पद वागणूकही दिली.


Mumbai Sakinaka Rape : साकीनाका बलात्कार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र केले दाखल, 346 पानांमध्ये 77 जणांचे जबाब


पीडित मुलीने इंडिया टुडेसोबत बोलताना ही माहिती दिली आहे. ती म्हणते, जेव्हा मी दुकानात पोहोचले तेव्हा दुकानमालकाने माझ्याशी गैरवर्तन केले. आणि पुन्हा दुकानात न येण्याचे सांगितले. दुकानदार वयोवृध्द असून आपले दुकान घरातून चालवतो. पण आश्चर्य म्हणजे या दुकानदाराच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीने त्याच्या वागण्यावर आक्षेप घेतला नाही. असे देखील तिने सांगितले आहे.

Shocking! Mistreatment of girl as wearing jeans instead of Burakha

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!