वृत्तसंस्था
पटियाला : पंजाबच्या पटियाला शहरात शुक्रवारी शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थकांमध्ये संघर्ष पेटल्यावर खलिस्तान्यांना यांना थेट भिडणारे शिवसैनिक हरीष सिंगला यांना शिवसेनेने तडकाफडकी निलंबित केले आहे. त्यांच्या निलंबनाचे पत्र पंजाबचे शिवसेनेचे प्रमुख योगराज शर्मा यांनी प्रसिद्ध केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार हरीश सिंगला यांना ताबडतोब निलंबित करण्यात येत आहे, असे या पत्रात योगराज शर्मा यांनी नमूद केले आहे.Shiv Sainik Harish Singh suspended
खलिस्तान विरोधात मोर्चा
शिवसेनेने खलिस्तान्यांच्या विरोधात मोर्चा काढला असता काली माता मंदिरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. खलिस्तानी समर्थकांनी दगडफेक केली. घटनास्थळी नियंत्रण मिळवण्यासाठी एसएसपी पोहोचले आणि त्यांनी हवेत गोळीबार केला. या दरम्यान हिंदू नेता आणि त्रिपदीचे एसएचओ कर्मवीर सिंग जखमी झाले.
शिवसेना कधीही खलिस्तान होऊ देणार नाही
शिवसेना कधीही पंजाबमध्ये खलिस्तान होऊ देणार नाही आणि कोणाला खलिस्तानीचे नावही घेऊ देणार नाही, असे हरीष सिंगला यांनी जाहीर केले होते. सिख फॉर जस्टिसचे निमंत्रक गुरपतवंत पन्नू यांनी 29 एप्रिल रोजी खलिस्तान स्थापना दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही 29 एप्रिललाच खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढण्याचे जाहीर करून हरीष सिंगला यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता.
खलिस्तानी समर्थकांचा पोलीसांवर हल्ला
या मोर्चाबद्दल माहिती मिळताच खलिस्तानी समर्थक मोठ्या प्रमाणावर तिथे गोळा झाले होते. या मोर्चात शिवसैनिक खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते. पटियाला शहरातील काली माता मंदिर परिसरात शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थकांमध्ये दगडफेक झाली. या सगळ्या गोंधळामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. खलिस्तानी समर्थकांनी तलवारीने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत 15 राऊंड फायर करावे लागले.
पण जे शिवसैनिक हरीष सिंगला मोठ्या धैर्याने खलिस्तानी समर्थकांना भिडले त्यांनाच शिवसेनेने तडकाफडकी निलंबित करून टाकले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App