AC local : ऐन उन्हाळ्यात केंद्राचा दिलासा; मुंबईत एसी लोकलच्या तिकीट दरांत 50 % कपात!!


प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत एसी लोकलच्या दरांत कपात व्हावी अशी मुंबईकरांची मागणी होती. एसी लोकलचा दर खूप असल्याने प्रवासी त्यातून प्रवासही करत नव्हते. त्यामुळे आता एसी लोकलचे दर 50 % नी कपात करण्यात आले आहेत. ऐन उन्हाळ्यात केंद्र सरकारने मुंबईकरांना हा “थंडा थंडा कुल कुल” दिलासा दिला आहे. in summer center relief ticket rate less

उन्हात किफायतशीर दरामध्ये मुंबईकरांना लोकल ट्रेनचा प्रवास करता यावा, यासाठी दर कमी करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याबद्दल त्यांनी केंद्राचे आभारही मानले आहेत. देवेंद्र फडणवीस नागपुरात बोलत होते.

आता प्रवाशांची पसंती असेल

मागच्या काही दिवसांपासून एसी लोकल प्रवासाच्या तिकीट दरांबाबत दिलासादायक निर्णय येईल, याची कल्पना मुंबईकरांना होती. मात्र कपात फार फार तर 20 किंवा 30 % होईल, असे बोलले जात होते. त्याबाबतचा प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाला देण्यात आलेला. मात्र अखेर वीस अधिक तीस अशी गोळाबेरीज करत थेट 50 % टक्केच कपात एसी लोकलच्या तिकीट दरांमध्ये करण्यात आल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता तिकीट दरांतील कपातीनंतर मुंबईतील प्रवाशी एसी लोकलला पसंती देतील, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे.

..म्हणून तिकीट दरांत कपात

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून लोकलची ओळख आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वतीने काही एसी लोकलदेखील चालवण्यात येतात. मात्र या लोकलचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने, म्हणावा असा प्रतिसाद मिळत नव्हता. प्रवासी संख्या वाढावी यासाठी तिकीटीचा दर कपात करण्यात आली आहे.

in summer center relief ticket rate less

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात