Raj Thackeray : संभाजीनगर सभेच्या “यशस्वीतेसाठी” सर्व विरोधकांचा केवढा तो “आटापिटा”…!!


मनसेप्रमुख राज ठाकरे यांची संभाजीनगरची सभा यशस्वी करण्यायासाठी मनसैनिक प्रचंड मेहनत घेत आहेत, असा जर महाराष्ट्रातल्या जनतेचा “समज” असेल असेल, तर तो “गैर” आहे, असे म्हणणे आता भाग पडत आहे…!! म्हणजे मनसैनिक राज साहेबांच्या सभेसाठी मेहनत घेत नाहीत, असे अजिबात म्हणायचे नाही. ते त्यांच्या परीने प्रचार – प्रसार करतच आहेत, पण राज ठाकरे यांची सभा “यशस्वी” करण्यासाठी विरोधक जेवढा “आटापिटा” करत आहेत ना…, तो पाहिल्यानंतर मनसैनिकाचे सगळी मेहनत, सगळे प्रयत्न त्या मानाने फारच “तोकडे” आहेत असे म्हणावे लागते आहे…!!Mansainik is working hard to make Raj Thackeray’s meeting in Sambhajinagar a success

– भीम आर्मीचा डांगोरा

आता हेच पाहा ना मनसैनिक जेवढा राजसाहेबांच्या सभेचा प्रचार करत नाहीत, तेवढा “प्रचार आणि प्रसार” भीम आर्मी नावाच्या संघटनेचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. भीम आर्मीने आधी ही सभाच होऊ नये यासाठी आटापिटा केला. आता सभा पोलीस परवानगीने होणारच आहे, म्हटल्यानंतर जर राज ठाकरे यांनी पोलिसांच्या अटी शर्ती पाळल्या नाहीत, तर आम्ही सभेमध्ये घुसून फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाने घोषणाबाजी करू, अशी नवी धमकी भीम आर्मीने दिली आहे या धमकीचा देखील भरपूर गाजावाजा झाला आहे.

– “रिपब्लिकन” कोर्टात

अन्य एक संघटना “रिपब्लिकन” न्यायालयात गेली आहे. त्या संघटनेचे नेते जयकिशन कांबळे त्यांनी न्यायालयात अर्ज करून सभा रद्द करण्याची मागणी केली आहे.

– वंचित बहुजन आघाडीचा “शांती मार्च”

महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी सायंकाळी राज ठाकरेंची सभा आहे पण त्यादिवशीचा “राजकीय मुहूर्त” साधत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी संभाजीनगरात “शांती मार्च” काढणार आहे. (राज ठाकरे यांच्या सभेला येताना मात्र कोणी मिरवणूक काढता कामा नये, अशी पोलिसांची अट आहे.) आता एवढा सगळा “प्रचारक अँटे” फौजफाटा राज साहेबांच्या सभेसाठी “कामाला” लागल्यानंतर मनसैनिकांची मेहनत त्यांच्यापुढे “तोकडी” पडणार नाही तर काय…??

इतकेच नाही तर राजसाहेबांच्या सभेसाठी प्रचार करण्यास राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते हिरिरीने पुढे आले आहेत. ते रोज काही ना काही तरी टीकाटिपणी करतच आहेत. यात जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्या पासून सक्षणा सलगर पर्यंत सगळे आलेत.

– कोल्हापूरची “हतभागी” सभा

बरं हे सगळे विरोधक फक्त राज ठाकरे यांच्या संभाजीनगर च्या सभेचा “प्रचार प्रसार” करत नाही, तर ते पुढच्या 3 तारखेच्या अक्षय तृतीया महाआरतीचा आणि 5 जूनच्या अयोध्या दौराचाही “प्रचार प्रसार” करून घेताना दिसत आहेत. राज साहेबांच्या मनसैनिकांपेक्षा राष्ट्रवादी – शिवसेना – भाजप यांचे नेते आणि कार्यकर्ते संख्येने तिप्पट-चौपट आहेत आणि ते सगळे “खास” राज साहेबांच्या प्रचार – प्रसारासाठी कामाला लागले आहेत. एवढे “राजकीय भाग्य” क्वचितच एखाद्या नेत्याला लाभले असेल. पवारांनी एवढी मोठी सभा कोल्हापुरात घेतली. पण तिच्या वाट्याला हे “भाग्य” आले नव्हते…!! ती सभा साध्या प्रसिद्धीच्या बाबतीतही “हतभागीच” ठरली…!!

– पवारांचे “अदखलपात्र”; महाराष्ट्राचे “दखलपात्र”

शरद पवार म्हटलेच होते ना राज ठाकरे “अदखलपात्र” आहेत…!! पण शरद पवारांच्या विधानाचा नेहमी अर्थ उलटा घ्यायचा असतो. हेच पुन्हा एकदा या निमित्ताने सिद्ध झाले आहे. पवार म्हणाले होते ना… राज ठाकरे “अदखलपात्र” आहेत, याचाच अर्थ ते महाराष्ट्रात “सर्वाधिक दखलपात्र” आहेत आणि म्हणूनच राज ठाकरे यांचे सर्व विरोधक त्यांच्या संभाजीनगरच्या सभेचा, 3 तारखेच्या अक्षय तृतीया महाआरतीचा आणि 5 जूनच्या अयोध्या दौऱ्यासाठी भरपूर डांगोरा पिटताना दिसत आहेत.

Mansainik is working hard to make Raj Thackeray’s meeting in Sambhajinagar a success

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”