विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकून समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यामुळे देशभरात जल्लोषही होत आहे. मात्र, या जल्लोषामुळे कॉँग्रेसचे खासदार शशी थरुर यांना मळमळ होऊ लागली आहे. अधून-मधून मिळालेल्या कास्य पदकांचा अभिमान कसा बाळगायचा असा सवाल त्यांनी केला आहे. यावरून नेटकºयांनी थरुर यांना चांगलेच धुतले आहे.Shashi Tharoor felt nauseous due to Indian excitement, Who would be proud to have won a bronze medal from time to time?
शशी थरुर यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आम्ही भारतात ऑलिम्पिकमध्ये अधूनमधून कास्य पदक मिळाल्याचे उत्सव साजरे करत असताना, चिनी राष्ट्रवादी मात्र त्यांच्या खेळाडूंनी रौप्यपदके जिंकल्याबद्दल निषेध करत आहेत.
प्रा.डॉ.संजीव बगाई नावाच्या वापरकत्यार्ने ट्विटरवर म्हटले आहे की हे आतापर्यंतचे सर्वात विचित्र आणि चुकीचे विधान आहे; भारतीय खेळाडूंनी कोविड -19 ला लढा दिला आहे आणि तरीही चांगले काम केले आहे, ते प्रशंसा आणि प्रोत्साहनास पात्र आहेत;
कृपया आपले ट्विट हटवा. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, जर अधूनमधून कांस्य पदक साजरे करणे ही तुमची समस्या असेल तर चीन आणि तुमच्या नेत्यांच्या परिवारात कोणता सामंजस्य करार झाला होता हे उघड करा. आम्ही ते अनंत काळ साजरे करू.
श्रीमान थरूर चीन तुमच्यासारख्या लोकांसाठी आदर्श असू शकतात. पण संपूर्ण भारताला त्यांचे अनुकरण करणे कधीच आवडणार नाही. आम्ही आमच्या कांस्य, रौप्य आणि पदकविजेत्या खेळाडूंचे स्वागत करू आणि जोपर्यंत ते विश्वविजेते होणार नाहीत तोपर्यंत त्यांना प्रोत्साहित करू. आम्ही लोकशाहीवादी आहोत असे अभिषेक दुबे यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App