शरद पवारांची अमित शहांची चर्चा संभाव्य ईडी कारवाईभोवती केंद्रीत??

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी मंगळवारी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी साखरेचे दर वाढविणे आणि नव्या इथेनॉल धोरणाविषयी चर्चा केली असे सांगितले गेले. मात्र, या भेटीचा मुख्य उद्देश हा नवे सहकार मंत्रालय, महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र आणि ईडीच्या कारवाईचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भोवती आवळत चाललेला फास यावर चर्चा करण्याचा होता, अशी राजकीय असल्याची चर्चा दिल्लीच्या सर्कल्समध्ये रंगली आहे. Sharad Pawar’s discussion centered around Amit Shah’s possible ED action ??

शरद पवार यांनी मंगळवारी संसदेत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे, साखर महासंघाचे पदाधिकारी प्रकाश नाईकनवरे आणि जयप्रकाश दांडेगावकर उपस्थित होते. साधारणपणे अर्धा तास झालेल्या या भेटीत पवार यांनी साखरेचे दर आणि नव्या इथेनॉल धोरणाविषयी चर्चा केली. त्याविषयी केंद्रीय मंत्री शहा सकारात्मक असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.



 

त्याचप्रमाणे कोकणात दरवर्षी येणारा पुर लक्षात घेऊन एनडीआरएफचा तळ महाड येथे उभारण्याची आणि एनडीआरएफचे मदतीचे निकष बदलण्याची विनंती पवार यांनी केली. त्याविषयीदेखील शहा अतिशय सकारात्मक असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

भेटीविषयी उघडपणे एवढेच सांगितले गेले असले तरी चर्चेच्या केंद्रस्थानी सहकार मंत्रालय व ईडीची कारवाई हे विषय असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले

नव्या सहकार मंत्रालयाची स्थापना आणि त्याची सूत्रे अमित शहा यांनी स्वीकारल्यानंतर प्रथमच पवार यांनी त्यांची भेट घेतली. पवार यांनी १५ दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेऊन सहकार विषयावरच चर्चा केली होती. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र, सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार, ईडीची सुरू असलेली कारवाई या पार्श्वभूमीवर सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची अस्वस्थता स्पष्ट झाली आहे. त्यामुळे पवार यांच्या मोदी आणि शहांच्या भेटीस विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

‘Sharad Pawar’s discussion centered around Amit Shah’s possible ED action ??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात