15 Opposition Party Rashtra Manch Meeting : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांना एकत्र करणे सुरू केले आहे. सोमवारी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची भेट घेतल्यानंतर पवार यांनी मंगळवारी संध्याकाळी चार वाजता ‘राष्ट्र मंच’ची बैठक बोलावली आहे. यशवंत सिन्हा यांनी 2018 मध्ये मोदी सरकारच्या धोरणांच्या विरोधात ‘राष्ट्र मंच’ची पायाभरणी केली. Sharad Pawar meets Prashant Kishor again, Pawar Delhi Residence 15 Opposition Party Rashtra Manch Meeting tomorrow
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांना एकत्र करणे सुरू केले आहे. सोमवारी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची भेट घेतल्यानंतर पवार यांनी मंगळवारी संध्याकाळी चार वाजता ‘राष्ट्र मंच’ची बैठक बोलावली आहे. यशवंत सिन्हा यांनी 2018 मध्ये मोदी सरकारच्या धोरणांच्या विरोधात ‘राष्ट्र मंच’ची पायाभरणी केली.
कोरोना साथीच्या नंतर प्रथमच विरोधी पक्षांचे नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगऐवजी एकाच ठिकाणी जमणार आहेत. राष्ट्र मंचच्या बॅनरखाली आयोजित सभेला १५ पक्षांचे नेते उपस्थित राहू शकतात. यशवंत सिन्हा, आम आदमी पार्टीचे संजय सिंह, पवन वर्मा आणि इतर अनेक नेते या बैठकीला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रथमच राष्ट्र मंचच्या बैठकीत भाग घेतील. सध्या हे व्यासपीठ राजकीय आघाडी नाही, परंतु भविष्यात याचीच तिसरा आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शरद पवार यांनी 15 दिवसांत दोनदा प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे. यापूर्वी 11 जून रोजी दोघांचीही पवारांच्या मुंबईत घरी भेट झाली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. २०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी या बैठकीकडे मोठी घडामोड म्हणून पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी पवार सर्व विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी यूपीएच्या बॅनरखाली एकत्र येण्याऐवजी नवं बॅनर घेऊन एकत्र येण्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. यूपीए अयशस्वी ठरल्याने राष्ट्रमंचच्या बॅनरखाली एकत्र आल्यास भाजपला धक्का देण्याचा विरोधकांना विश्वास. या नव्या बॅनरच्या माध्यमातून देशभरातील जनतेला आकर्षित करणं सोपं जाईल, असं काही नेत्यांचं मत आहे. राष्ट्र मंच नावानं ही नवी तिसरी आघाडी उघडण्यावर या बैठकीत चर्चा होईल.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच राष्ट्र मंचवर शिक्कामोर्तब केले आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यात संघर्ष सुरू आहे. यापूर्वी ममता यांनी विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यांनी आपल्या निवडणूक सभांमध्ये म्हटले होते की, विरोधी पक्षांनी एकत्र आल्यास 2024 च्या निवडणुकीत ते मोदींना हरवू शकतात, पण आता कोरोनाशी लढण्यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे.
सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्षा आहेत. त्या आजारी असल्याने यूपीएचं अध्यक्षपद पवारांकडे देण्याची मागणी अधूनमधून होत आलेली आहे. परंतु, काँग्रेसने पद सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रमंच नावानं तिसरा पर्याय निर्माण करून त्यांचं नेतृत्व पवारांकडे देण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. भाजप विरोधातील आघाडी पवारांच्या नेतृत्वाखालील असेल की काँग्रेसच्या, हे आता उद्याच्या बैठकीतूनच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Sharad Pawer meets Prashant Kishor again, Pawer Delhi Residence 15 Opposition Party Rashtra Manch Meeting tomorrow
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App