Jammu Kashmir Delimitation : जम्मू-काश्मीरमधील सीमांकन प्रक्रिया मार्च 2022 पर्यंत संपेल आणि त्यानंतर येथे विधानसभेच्या सात जागा वाढतील. ही माहिती सीमांकन आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई आणि सदस्य सुशील चंद्र, के.के. शर्मा यांनी जम्मू येथे पत्रकार परिषदेत दिली. seven seats will increase after jammu and kashmir delimitation process Which will end by march 2022
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील सीमांकन प्रक्रिया मार्च 2022 पर्यंत संपेल आणि त्यानंतर येथे विधानसभेच्या सात जागा वाढतील. ही माहिती सीमांकन आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई आणि सदस्य सुशील चंद्र, के.के. शर्मा यांनी जम्मू येथे पत्रकार परिषदेत दिली.
माध्यमांना संबोधित करताना रंजना प्रकाश देसाई म्हणाल्या, आम्ही तीन दिवस इथे आहोत. सर्व पक्षांचे विचार नोंदवले गेले आहेत. आम्ही कायद्यानुसार काम करू. भविष्यात पुन्हा येऊ. सीमांकन 2011च्या जनगणनेवर आधारित असेल. पूर्वीच्या परिसीमनमध्ये 12 जिल्हे होते, परंतु आता राज्यात 20 जिल्हे आहेत. आयोगाच्या सदस्यांनी 290 हून अधिक पक्ष आणि संघटनांची भेट घेतली, यात जवळपास 800च्या आसपास सदस्य होते. या पक्षांनी परिसीमन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. काही पक्षांनी राजकीय आरक्षणाचीही मागणी केली.
सीमांकन आयोगाने मुख्य सचिवांची भेट घेऊन राज्याच्या एका अधिकाऱ्याला नोडल अधिकारी बनवण्याची मागणी केली. आयोगाने असे म्हटले आहे की, ज्यांना या परिसीमनबद्दल काही मत मांडायचे आहे ते या नोडल अधिकाऱ्याकडे नोंदवू शकतात. काही राजकीय पक्षांनी परिसीमन आयोगापासून अंतर राखले, आम्हाला आशा आहे की, त्यांनी यावे. पहिल्या परिसीमामध्ये भौगोलिक परिस्थिती विचारात घेतली नव्हती. आम्ही खात्री देतो की, ही प्रक्रिया कायद्यानुसार होईल आणि पारदर्शक असेल. आमच्यासाठी जम्मू आणि काश्मीर एक केंद्रशासित प्रदेश आहे.
seven seats will increase after jammu and kashmir delimitation process Which will end by march 2022
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App