फाळणी आणि स्वातंत्र्य : कट्टर हिंदुत्ववादी आणि कट्टर कम्युनिस्ट यांच्या आकलनात विलक्षण साम्य!!, पण मोठा भेद, तो कुठे??


विनायक ढेरे

आज 14 ऑगस्ट देशाच्या फाळणीचा वेदना दिन. सन 2021 मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट इथून पुढे देशाच्या “फाळणीचा वेदना दिन” अर्थात “फाळणी शोकांतिका दिवस” म्हणून पाळला जाईल, असे जाहीर केले होते. फाळणी भारताची शोकांतिका आहे. Savarkar and Balaraj Sahani, a communist had same understanding of partition and independence, but differences on its solutions

समस्त भारतीयांसाठी 14 ऑगस्ट हा दिवस वेदनादायी आहे. पाकिस्तानसाठी तो निर्मितीचा दिवस असला, तरी अखंड भारतमाता त्यादिवशी खंडित झाली होती म्हणून आणि इतकेच नव्हे तर भारतमाता खंडित होताना लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागले होते. लाखो लोकांना जखमी व्हावे लागले होते म्हणून हा समस्त भारतीयांसाठी वेदना दिवस आहे!!

 वेदनांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न

फाळणीच्या या वेदना घेऊन भारत पिढ्यानपिढ्या जगतो आहे. आधीच्या 70 वर्षांमध्ये या वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करण्याचा नव्हे, तर झाकण्याचा किंवा त्या वेदनाच नव्हत्या, असे म्हणून त्यावर पडदा टाकण्याचा तो काळ होता. आता काळ बदलला आहे. मुक्या वेदनांना शब्दरूप मिळायला संधी मिळाली आहे, तो आजचा दिवस आहे!!

https://youtu.be/iqtq74VrpsE

 फाळणी का झाली??

पण मूळात फाळणी झालीच का?? कशी?? यासाठी कोण आणि कसे कारणीभूत होते?? याविषयीची राजकीय आणि सामाजिक पातळीवरची वेगवेगळी आकलने आहेत. ती समजून घेताना एका विलक्षण साम्याकडे माझे लक्ष गेले. ते साम्य म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी आणि कट्टर कम्युनिस्ट अशा दोन्ही विचारसरणीच्या विशिष्ट पातळीवरच्या धुरिणांचे फाळणी आणि स्वातंत्र्य यांचे समान आकलन!! हे विलक्षण साम्य आढळले ते राजकीय हिंदुत्व मांडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कट्टर कम्युनिस्ट विचारसरणीचे अनुयायी अभिनेते बलराज सहानी यांच्या विचारात!! दोन्हीही राजकीय विचार प्रणाली अतिशय टोकाच्या, एकमेकांना पूर्णपणे छेद देणाऱ्या… पण तरीही फाळणी आणि स्वातंत्र्य याविषयीच्या आकलनात साम्य!!

 सावरकरांचे भाषण युट्युब वर उपलब्ध

नेमकी परिस्थिती काय होती?? कुणामुळे फाळणी झाली?? याविषयीचे सावरकरांचे एक भाषण युट्युब वर उपलब्ध आहे. सावरकरांच्या मते देशाची फाळणी इंग्रजांपेक्षाही हिंदूंनी केली. म्हणजे तत्कालीन हिंदू सत्ताधाऱ्यांनी केली. त्यांनी त्यांच्या इच्छेने केली. किंबहुना त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट साइन करून म्हणजे सरळ सरळ मुसलमानांशी एक करार करून देशाची फाळणी घडवून आणली. सावरकरांचा मूळ कटाक्ष आहे, तो थेट त्यावेळच्या सत्ताधारी काँग्रेस नेतृत्वावर!! त्या नेतृत्वाने देशाची फाळणी कराराद्वारे घडवून आणली. त्यामुळे सावरकरांच्या भाषेत बोलायचे झाले, तर एका कोपऱ्यात हिरवा रंग तयार झाला आणि दुसऱ्या कोपऱ्यातही हिरवा रंग तयार झाला. म्हणजे पूर्व आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. सावरकरांच्या मते ही चूक होती आणि ही चूक जर सुधारली तर त्यांनी उघडपणे असे सांगितले होते की अजूनही वेळ गेलेली नाही… पण ही चूक झाली हे जर लक्षात आले नाही, तर मात्र यापेक्षाही भयंकर परिणाम ठरलेला आहे तो म्हणजे एका कोपऱ्यातला हिरवा रंग आणि दुसऱ्या कोपऱ्यातला हिरवा रंग एक दिवस सगळा हिंदुस्तान हिरवा करून टाकतील, असा इशारा त्यांनी भाषणात दिला होता.

 सावरकरांच्या इशाऱ्यातले तथ्य

सावरकरांचा इशारा गेल्या 70 वर्षांमध्ये पॉलिटिकल प्रशिक्षण लेव्हलवर 100% खरा उतरल्याचे दिसते भारतीय राज्यकर्त्यांचा सोच विचार हा मुस्लिम धार्जिणात राहिला आहे. भले त्याने जामानिमा धर्मनिरपेक्षतेचा आणि घटनात्मक ढाचाचा स्वीकारला असेल मूलभूत सोच विचार मुस्लिम धार्जिणाच राहिला हे नाकारता येणार नाही.

 बलराज सहानींचे विचार

अशाच विचारांशी विशेषतः फाळणी आणि स्वातंत्र्य मिळण्याच्या काळातल्या विचारांशी कम्युनिस्ट विचारसरणीचे अभिनेते बलराज सहानी यांचे सावरकरांच्या विचारांशी विलक्षण साम्य आढळते. बलराज साहनी यांनी आपल्या आत्मचरित्रात स्वातंत्र्य मिळण्याच्या वर्षात नेमके काय झाले?, याचा जो आढावा घेतला आहे तो अक्षरशः आपले डोळे उघडून जातो!! “मेरी फिल्मी आत्मकथा” हे बलराज सहानी यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे. त्याचा मराठी अनुवाद अंबरीश मिश्र यांनी “माझ्या जीवनाची पटकथा” या नावाने केला आहे. या “जीवनाच्या पटकथेत” बलराज सहानी यांनी तत्कालीन कम्युनिस्टांना आणि काँग्रेस नेतृत्वाला देशाच्या फाळणीबद्दल उघड उघड दोष दिला आहे. किंबहुना यामध्ये ते म्हणतात, की माझ्या मनात एक विचार राहून राहून येत राहतो.

तो बरोबर असेल की चूक असेल. पण त्या सगळ्या काळात (स्वातंत्र्य आणि फाळणीच्या काळात) कम्युनिस्ट नेतृत्वाने ब्रिटिश सरकारशी जुळवून घेतले होते. त्यापेक्षा त्यांनी आम जनतेशी जुळवून घेतले असते आणि नौदलाच्या खलाशांच्या बंडाला संपूर्ण पाठिंबा दिला असता तर ब्रिटिश राजवट तात्काळ मोडून पडली असती. क्रांतीच्या विचारांनी लोक भारले होते. बंडखोर खलाशांना पाठिंबा म्हणून वायुसेनेच्या भारतीय सैनिकांनी संप सुरू केला होता. मुंबईचे पोलीस दलही प्रचंड नाराज होते. नेताजींच्या आझाद हिंद फौजेच्या पावलावर पाऊल ठेवून लष्कराने बंडाचा झेंडा उभारला असता तर आश्चर्य वाटलं नसतं, अशी परिस्थिती होती. पण आमच्या नेत्यांच्या हे लक्षातच नाही. त्यांनी योग्य निर्णय घेतला असता तर देशाची फाळणी झाली नसती हे एक आणि दुसरं आज जनतेला जी नोकरशाही भ्रष्ट सरकारी व्यवस्था छळते आहे तिचा ढाचाच देशात शिल्लक राहिला नसता. पण नेत्यांनी जनतेचे साथ सोडली आणि इंग्रजांशी समझोता केला.

 फक्त गांधीजींना जबाबदार धरणे चूक

पण यासाठी फक्त गांधीजींनाच जबाबदार किंवा दोषी धरणे चूक आहे. कारण त्यांची भूमिका स्पष्ट होती. ते अहिंसेला परम धर्म मानत होते. आयुष्याचा मूलभूत सिद्धांत म्हणून त्यांनी अहिंसेचा स्वीकार केला होता. नेतृत्वाच्या जबाबदारीतून मला मोकळं करा, असं त्यांनी अनेक वेळा काँग्रेस नेत्यांना सांगितलं होतं. परंतु नेहरू आणि काँग्रेसच्या अन्य पुढार्‍यांना गांधीजींच्या कडेवर बसण्याची सवय झाली होती. त्यामुळे स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घेणे या मंडळींना जमत नसे.

 नेहरूंच्या इन्कलाबी चेतनाच्या डुलक्या

नेहरु दूरदर्शी होते पण खलाशांच बंड झालं तेव्हा त्यांनी परिस्थितीचे आकलन नीटपणे करायला हवं होतं, तर त्यांच्या लक्षात आलं असतं की देशभर संतापाचा महापूर आलाय आणि जनक्षोभाला प्रतिबंध केला तर त्याचे परिणाम पुढे भयानक होतील. नंतरच्या काळात ते नेहरूंनी मान्यही केलं. ते निर्भय होते. कदाचित तेव्हा ते मैदानात उतरले असते तर चित्र वेगळे दिसले असते. पण या झाल्या जर तरच्या गोष्टी. वस्तुस्थिती अशी आहे की खलाशांच्या बंडाच्या वेळी देशात संतापाचा डोंग उसळला होता आणि क्रांतीदर्शी नेहरूंची इन्कलाबी चेतना डुलक्या घेत होती!!

 नेताजी असते तर…

अशावेळी विचार येतो की तेव्हा नेताजी सुभाष असते तर… देशात मोठा उद्रेक व्हावा अशी नेताजींची इच्छा होती. त्या आशेपायी त्यांनी आपला आत्मा गहाण ठेवून जर्मन आणि जपानी हात मिळवणी केली होती. पण नेताजी हयात असते तर ते स्वस्थ बसले नसते. सरदार पटेल आणि बॅरिस्टर जिना यांच्या मध्यस्थीमुळे विद्रोही खलाशांनी हातातली शस्त्र खाली ठेवली आणि इंग्रजांनी या उपकाराची परतफेड कशी केली असेल??, तर दोन जमातींमध्ये त्यांनी झगडा लावून दिला. जनक्षोभाच्या महापुरात खरंतर ब्रिटिश साम्राज्य वाहून जायचं. पण झालं विपरीत या महापुरात भारतीय गटांगळ्या खाऊ लागले. राग खदखदच होता. लोक संताप एक दुसऱ्यावर काढू लागले आणि इन्कलाबी युद्धाचं रूपांतर जातीय दंगलीत झालं. त्याचे परिणाम फाळणीत झाले. सगळे ज्येष्ठ राजकीय पुढारी अगदी गांधीजीं सकट सगळेच संभ्रमात होते. आमच्यासारख्या पोराटोरांचे तिथे काय चालणार?? काय घडतय काही कळत नव्हतं. फाळणीचं दुःख मात्र उरात कायम राहिलं!! हे परखड निरीक्षण बलराज सहानी यांचे आहे!!

 आकलनात साम्य, उपाययोजनेत भेद!!

सावरकर आणि बलराज सहानी यांच्या फाळणी आणि स्वातंत्र्याविषयीच्या आकलनात हे विलक्षण साम्य आहे… फरक आहे, तो उपाययोजनांमध्ये. सावरकरांना कोणत्याही स्थिरित फाळणी मान्य नव्हती. त्यासाठी हिंदूंच्या सैनिकीकरणासह सिव्हील वॉरची त्यांची तयारी होती. (हिंदूंची तयारी नसताना पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात सिव्हील वॉर झालेच. फक्त त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी ते झाकले.) पण बलराज सहानी हे त्याकडे फक्त “जातीय भांडण” म्हणून पाहत होते आणि ते जातीय भांडण सुभाषचंद्र बोस सोडवू शकले असते, अशी त्यांची समजूत होती… हा दोघांच्याही विचारात मधला महत्त्वाचा भेद आहे…

 धडा घेऊन चुका टाळण्यासाठी!!

पण इतिहासाने जो निकाल द्यायचा आहे, तो देऊन झाला आहे. देशाची फाळणी होऊन 75 वर्षे उलटली आहेत. परंतु तरीही त्या इतिहासात डोकवायचे, ते चुका का झाल्या?? कोणाच्या झाल्या?? हे फक्त उगाळण्यासाठी नाही, तर त्या चुकांमधून धडा घेण्यासाठी, कायमचे शिकण्यासाठी!!… आणि भविष्यातल्या राजकीय स्ट्रॅटेजिक चुका टाळण्यासाठी!!

Savarkar and Balaraj Sahani, a communist had same understanding of partition and independence, but differences on its solutions

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात