यूपी-बिहारी सर्वत्र; संत रविदासही यूपीचे, मग त्यांनाही बाहेर काढणार का?; पंतप्रधान मोदी यांचा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फटकारले


वृत्तसंस्था

चंडीगड : प्रांतवादाचे तुणतुणे वाजविणाऱ्या पंजाबाचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चेन्नी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चांगलेच फटकारले आहे. राज्यात यूपी-बिहारी सर्वत्र आहेत. संत रविदासही यूपीचे, मग त्यांनाही बाहेर काढणार का?; असा रोखठोक सवाल पंतप्रधान मोदी यांनी चन्नी यांना केला. UP-Bihari everywhere; Sant Ravidas also from UP, then Will you take them out too ?; Prime Minister Modi slaps Punjab Chief Minister

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पंजाबमधील अबोहर येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले. चन्नी यांनी यूपी-बिहारच्या बांधवांचा उल्लेख केला होता. मोदी म्हणाले की, काँग्रेस नेहमीच एका भागातील जनतेला दुसऱ्या प्रदेशाविरुद्ध लढवत आहे. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी विधान केले आणि दिल्लीच्या गांधी कुटुंबाने बाजूला उभे राहून टाळ्या वाजवल्या. हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. या विधानांमुळे कोणाचा अपमान होतोय?

मोदी म्हणाले, “येथे असे एकही गाव नसेल, जिथे उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील आमचे भाऊ-बहिणी कष्ट करत नसतील. आम्ही संत रविदासजींची जयंती साजरी केली. संत रविदासजींचाही जन्म उत्तर प्रदेशातील बनारसमध्ये झाला. काँग्रेस म्हणते उत्तर प्रदेशातील बांधवांना येऊ देणार नाही. हे लोक श्री गुरु गोविंद सिंग यांचा अपमान करत आहेत?’


संत रविदास जयंती निमित्त मोदी – योगींकडून दर्शन आणि शबद कीर्तन, लंगर मध्ये सहभाग!!


पंतप्रधानांच्या भाषणातील तीन मुद्दे

१. शेतकरी मला नक्कीच आशीर्वाद देतील

किसान सन्मान निधी म्हणून पंजाबमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३,७०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. पंजाबमध्ये २३ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. शेतकरी मला नक्कीच आशीर्वाद देईल. पंतप्रधान म्हणाले की, देशात सर्वत्र आयुष्मान भारत योजनेद्वारे उपचार केले जातात. दिल्ली सरकार या योजनेशी संबंधित नाही, त्यामुळे ५ लाखांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा नाही. पंजाबच्या लोकांना दिल्लीत वैद्यकीय सुविधा मिळत असतील तर त्यांच्या पोटात उंदीर का धावत आहेत. जे पंजाबच्या लोकांना दिल्लीत येऊ देत नाहीत, ते पंजाबमध्ये मत का मागत आहेत?

२ पंजाबमधील प्रत्येक व्यवसाय माफियांच्या ताब्यात
ते म्हणाले की आज पंजाबमधील प्रत्येक व्यवसाय माफियांच्या ताब्यात आहे. व्यापारी माफियांच्या दयेवर जगत आहेत. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना मोठा त्रास होत आहे. राज्यातील असुरक्षितता आणि चुकीच्या धोरणामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. पंजाबमधला उद्योग बाहेर जात आहे. तरुणांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळे येथे कोणी यायला तयार नाही. येथे आल्यानंतर त्यांना माफियांच्या आश्रयाला जावे लागणार आहे. आम्ही ते बदलू.

3. एक संधी द्या, वाळू आणि ड्रग माफिया संपतील

ते म्हणाले की, संपूर्ण पंजाबमध्ये एकच आवाज भाजपला जिंकून द्यायचे आहे. त्यामुळे येथे डबल इंजिनचे सरकार स्थापन झाले तर वेगवान विकास पंजाबमध्ये होणार आहे. वाळू आणि ड्रग माफियांचा सफाया होणार आहे. पंजाबमध्ये औद्योगिक विकास होईल. पंजाबच्या जनतेने आम्हाला संधी द्यावी.

Sant Ravidas also from UP, then Will you take them out too ?; Prime Minister Modi slaps Punjab Chief Minister

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात