विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने एक महत्त्वाचे पाऊल टाकत सुरु केलेल्या संसद टीव्हीतून सर्वपक्षीय नेत्यांना आपापल्या भूमिका मांडण्याची संधी देण्यात येत आहे. संसद टीव्हीवर शशी थरुर, प्रियंका चतुर्वेदी, अमिताभ कांत, करण सिंग, संजीव संन्याल या विविध राजकीय विचारसरणीच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांकडे विविध शो होस्ट करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Sansad TV gets in Opposition’s Shashi Tharoor, Priyanka Chaturvedi, to talk all but politics
यूपीएच्या कालावधीत हमीद अन्सारी उपराष्ट्रपती असताना राज्यसभा टीव्हीवर विशिष्ट अजेंडा चालवत त्यावेळचा विरोधी पक्ष भाजपला कमी संधी दिली जायची. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सुरू केलेल्या संसद टीव्हीवर सर्व पक्षांच्या नेत्यांना शो होस्ट करण्याची संधी देण्यात आली आहे.
प्रियांका चतुर्वेदी या शिवसेनेच्या खासदार “मेरी कहानी” या शोमध्ये सर्वपक्षीय महिला खासदारांच्या मुलाखती घेतील. काँग्रेसचे वरिष्ठ नेते करण सिंग हे “एकम् सत्” या नावाचा शो होस्ट करतील. विविध राजकीय विचार प्रणालींचा यात समावेश असेल. शशी थरूर “टू द पॉईंट” हा शो होस्ट करतील. अमिताभ कांत “इंडियाज ग्रोथ स्टोरी” तर संजीव संन्याल “इकॉनोमिक सूत्र” हे शोज होस्ट करतील.
संसद टीव्हीतून कुठल्याही एकारलेल्या विचार प्रणालीचा प्रसार न करता देशातल्या सर्व विचार सरणीला प्राधान्य देण्यात मोदी सरकार पुढाकार घेत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App