Delhi Oxygen Audit : दिल्लीतील ऑक्सिजन रिपोर्टसंदर्भात केजरीवाल सरकारवर भाजपने निशाणा साधला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्या खोटेपणामुळे 12 राज्यांत ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. कारण इतर सर्व ठिकाणचा ऑक्सिजनला कमी करून दिल्लीला पाठवावा लागला. या राज्यांना ऑक्सिजन मिळाला असता तर कितीतरी लोकांचे प्राण वाचू शकले असते. संबित पात्रा म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी हा भयंकर गुन्हा केला आहे, यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयात दोषी ठरवायला पाहिजे. Sambit Patra On Delhi oxygen Audit report said – 12 states were affected due to Kejriwal’s lies
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीतील ऑक्सिजन रिपोर्टसंदर्भात केजरीवाल सरकारवर भाजपने निशाणा साधला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्या खोटेपणामुळे 12 राज्यांत ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. कारण इतर सर्व ठिकाणचा ऑक्सिजनला कमी करून दिल्लीला पाठवावा लागला. या राज्यांना ऑक्सिजन मिळाला असता तर कितीतरी लोकांचे प्राण वाचू शकले असते. संबित पात्रा म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी हा भयंकर गुन्हा केला आहे, यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयात दोषी ठरवायला पाहिजे.
संबित पात्रा यांनी ऑक्सिजन ऑडिटचा हवाला देत म्हटले की, “केजरीवाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, त्यांनी आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑक्सिजनची मोजणी केली. परंतु जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने गठित समितीने अरविंद केजरीवाल यांना आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांची प्रत मागितली तेव्हा त्यांनी हात वर केले. विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात खोटे बोलले.
संबित पात्रा पुढे म्हणाले, “6 मे रोजी केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी केली. त्यानंतर काही तासांनंतर राघव चड्ढा म्हणाले की त्यांना 976 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्याच दिवशी दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळे आकडे सांगितले. हे कुठे ना कुठे एका षडयंत्रांतर्गत केले गेले. दिल्ली सरकारने आपली चूक लपवण्यासाठी केंद्रावर ठपका ठेवला आहे.”
ऑक्सीजन ऑडिटसाठी गठित समितीच्या म्हणण्यानुसार, 25 एप्रिल ते 10 मेदरम्यान दिल्ली सरकारने ऑक्सिजनची मागणी प्रत्यक्ष गरजेपेक्षा 4 पट जास्त केली होती. तर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दररोज दिल्लीला 700 मेट्रिक टन पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोर्टात युक्तिवाद सुरू होताना केंद्राचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही दिल्लीला जास्तीत जास्त 415 मेट्रिक टनची आवश्यकता असल्याचे सांगितले.
Sambit Patra On Delhi oxygen Audit report said – 12 states were affected due to Kejriwal’s lies
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App