वृत्तसंस्था
कोलकाता : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने स्वीकारलेल्या परराष्ट्र धोरणाला बिनशर्त पाठिंबा देणारे पत्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. सध्या जागतिक तिसऱ्या महायुद्धाच्या सावलीत भारत एक आहे आणि सर्व भारतीयांची एकजूट आहे. हे आपण एकत्र येऊन दाखवून दिले पाहिजे, असे ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.Russia Ukraine conflict: Mamata Banerjee’s letter unconditionally supporting Modi government’s foreign policy
भारतीय संघराज्यातील एक वरिष्ठ मुख्यमंत्री म्हणून आणि एका राष्ट्रीय पक्षाची अध्यक्षा म्हणून मी आपल्याला हे पत्र पाठवते आहे. जागतिक युद्धाच्या संकटात आपण असलेल्या धोरणाच्या पाठीशी आम्ही उभे राहू, असे आश्वासन ममता बॅनर्जी यांनी या पत्रात दिले आहे.
भारताचे परराष्ट्र धोरण नेहमीच जागतिक शांतता आणि सौहार्द यांना प्राधान्य देत आले आहे. केंद्र सरकार देखील त्यादृष्टीनेच पावले टाकत आहे. यासाठी संपूर्ण भारतीय संघराज्य आपल्या सरकारच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे आहे, अशी ग्वाही ममता बॅनर्जी यांनी या पत्रात दिली आहे.
– राजकीय प्रगल्भतेचे लक्षण
युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे या पार्श्वभूमीवर ल्यूटन्स मीडिया आणि काही विरोधी पक्ष मोदी सरकारला घेरत आहेत या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या कट्टर विरोधक असणाऱ्या मामाचा बॅनर्जी यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात पंतप्रधान मोदींना पाठिंबा देणे हे त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचे लक्षण मानण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App