CONTROVERSY : शिवरायांचे गुरू रामदास नव्हते – समर्थ रामदासांचा एकेरी उल्लेख ! शरद पवारांचा व्हीडिओ सुप्रिया सुळेंनी केला पोस्ट-जनतेचा संताप-समर्थ रामदासस्वामी तुमचे वर्गमित्र होते का?


  • छत्रपती शिवरायांचे गुरू रामदास नव्हते – समर्थ रामदासांचा एकेरी उल्लेख ! शरद पवारांचा व्हीडिओ सुप्रिया सुळेंनी केला पोस्ट ; जनतेचा संताप-श्री सद्गुरु समर्थ रामदासस्वामी तुमचे वर्गमित्र होते का?

  • जर समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हते या विचाराचे तुम्ही आहात तर मुख्यमंत्री असताना या पुतळ्याचे अनावरण करणारे पवार कुठले होते, असा सवाल तेव्हाही विचारला गेला आणि आताही विचारला जात आहे …

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास नसते तर शिवरायांचं अस्तित्त्व असतं का? असं वक्तव्य काल केलं. त्यावरून वाद निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका भाषणात  रामदास हे शिवरायांचे गुरू नव्हते असं सांगितलं होतं. आता तोच व्हीडिओ सुप्रिया सुळे यांनी ट्विट केला आहे.मात्र यावर नेटकरी नाराज आहेत त्यांनी रिट्विट करत सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिले आहे.CONTROVERSY: Shivaraya’s Guru was not Ramdasa ! Sharad Pawar’s video posted by Supriya Sule; Public outrage: Was Shri Sadguru Samarth Ramdasswami your classmate?

काय म्हणाल्या आहेत सुप्रिया सुळे?

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं…रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते .शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या.

याला उत्तर देताना एकाने चक्क ऐतिहासिक पुरावा शेअर केला आहे .त्यात समर्थ रामदासांनी रचलेले शिवरायांच्या भेटीचे वर्णन आहे .

त्यासह  शरद पवारांनी उद्घाटन केलेला समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा देखील ट्विट करण्यात आला आहे .

एकाने तर इतिहास पाहण्यापेक्षा कामे करण्याचा सल्ला दिला आहे

https://twitter.com/Uttejana01/status/1498152439371149315?s=20&t=xWnFNGIlJQofu4QcZaFB-A

तर दुसरा लिहितो हा फक्त ब्राह्मण द्वेष … तथाकथित पुरोगामी…

पवार साहेब इतिहासकार पण आहेत हे नव्यानेच कळाले. असो , इकडं तोंडाच्या वाफा वाया घालण्यापेक्षा तिकडं आमचे संभाजी राजे उपोषणाला बसलेत , त्यांच्या मागण्या मान्य करा ..

शिवाजी महाराज व शाहू महाराज यांचे वंशज आझाद मैदान मध्ये उपोषण करत आहे..जरा तिथे लक्ष्य द्या..सर्व पक्षीय राजकारणी लोकांनी या मराठा समाज च्या आरक्षण व्यतिरीक्त अन्य मागण्या कडे लक्ष्य द्यावे..

कशाला ताकाला जाऊन भांडे लपवता,सरळ लिहायचे एकही ब्राह्मण महाराजांच्या सैन्यात होता,ना अष्टप्रधान मंडळात होता ना पेशवे होते ना,आत्ताच्या पावनखिंड मधील बाजीप्रभू देशपांडे होता,ब्राह्मण ही जातच महाराजांच्या काळात अस्तित्वात नव्हते,अस्तित्वात होते फक्त,अफजल,शाहिस्ते,मुघल इ.मित्रमंडळी

रामदास? श्री सद्गुरु समर्थ रामदासस्वामी तुमचे वर्गमित्र होते का असा सवालही संतापलेल्या जनतेने केला आहे .

यापूर्वीही झाली आहे या विधानावर टीका  …

समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या शदर पवारांना एका फोटोद्वारे प्रश्न विचारण्यात आले होते.. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्घाटन केलेल्या स्मारकाच्या कोनशीलेचा एक फोटो व्हायरल झाला होता. ‘रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, शिवरायांच्या काळात  रामदास नव्हतेच, हा उलगडा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचल्यानंतर होईल, असे वादग्रस्त विधान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देशभरातून टीका केली जात होती.

पवारांनी जातीयवादाचे राजकारण करणे आतातरी थांबवावे, अशा प्रतिक्रीया त्यांच्या वक्तव्यावर उमटल्या. याच वेळी शरद पवार यांनी २६ एप्रिल १९९० रोजी अनावरण केलेल्या स्मारकाचा फोटो व्हायरल झााला.

जर समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हते या विचाराचे तुम्ही आहात तर मुख्यमंत्री असताना या पुतळ्याचे अनावरण करणारे पवार कुठले होते, असा सवाल तेव्हाही विचारला गेला आणि आताही विचारला जात आहे …

 

CONTROVERSY: Shivaraya’s Guru was not Ramdasa ! Sharad Pawar’s video posted by Supriya Sule; Public outrage: Was Shri Sadguru Samarth Ramdasswami your classmate?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात