संभाजी छत्रपतींचे उपोषण तिसऱ्या दिवशी मागे


विशेष प्रतिनिधी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार संभाजी छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेले उपोषण आज दुपारी मागे घेतले. त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. राज्य शासनाने त्यांच्याशी अखेर संपर्क साधला आणि उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली. Hunger strike of Sambhaj Chatrapati finished

खासदार संभाजी छत्रपती यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस होता. उपोषणाला बसलेल्या संभाजी राजे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांचा चेहरा सुकलेला दिसत असून चेहऱ्यावर थकवा जाणवत होता.



मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने दिलेला शब्द पाळला नाही,म्हणून त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते आझाद मैदानावर विविध ठिकाणांवरुन आंदोलक सहभागी झाले होते. संभाजी ब्रिगेडचे विराज तावरे आदी आंदोलकांची तब्येत खालावली होती. शिवसेनेचे पदाधिकारी त्यांना भेटून गेले होते.

उपोषणापूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही ज्या सात मागण्या केल्या होत्या. त्या आजही तशाच आहेत. त्यातील एकही मागणी आजतागायत पूर्ण झालेली नाही. एकही मागणी पूर्ण झाली नाही. 15 दिवसांत या मागण्या मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितले होते. पण अजूनही तोडगा निघालेला नाही. रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने साधी दखलही घेतली नाही. सरकारने शब्द पाळला नसल्याने उपोषणाशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय राहिला नाही.

संभाजी छत्रपती यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तब्बल 12 मिनिटे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं. बोलत असताना त्यांचा आवाज क्षीण झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर बोलताना डोळ्यात अश्रू तरळले

Hunger strike of Sambhaj Chatrapati finished

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात