सोलापूर रस्त्यावर पाटस येथे धाडसी दरोडा, पोलीस असल्याचे भासवून एसटी प्रवाशांचे सव्वा कोटी रुपये लुटले


विशेष प्रतिनिधी

पाटस : पाटस ( ता. दौंड ) येथे पोलीस असल्याचे भासवून एस टी मधील चार प्रवाशांचे सव्वा कोटी रुपये लुटण्यात आले. मंगळवारी मध्यराञीच्या सुमारास घडली.निलंगा – भिवंडी या एस. टी. मधून कुरियर सर्व्हिस करणारे हितेंद्र जाधव ( वाघोशी , ता. फलटण ) विकास बोबडे , तेजस बोबडे , संतोष बोबडे (तिघे रा. फलटण , जि. सातारा ) हे चौघे प्रवास करीत होते.Robbery at Patas on Solapur road, ST passengers one deore 25 lakhs looted

त्यांच्याकडे १ कोटी १० लाख रुपये रोख आणि दिडशे ग्राम मेटल होते. एसटी पाटस येथील ढमालेवस्ती परिसरात राञी एक वाजण्याच्या सुमारास आली असता चौघांनी अडवली.त्यांच्या हातात काठ्या , खाकी पॅन्ट परिधान केलेले आणि पायात बुट असा पेहराव असल्याने बस चालकाला पोलीस असल्याचे वाटले.त्याने बस थांबवली असता कंडक्टरने दरवाजा ऊघडताच या चौघांनी काठ्या आपटत पोलीस तोऱ्यात शिवीगाळ करुन कुरियरवाले कोण आहेत असे विचारले बस मध्ये पाठीमागे बसलेले चौघे ऊठले तेव्हा त्यांच्या शर्टच्या काॕलर पकडत त्यांना एसटी मधून बाहेर काढले आणि एसटी चालकाला जायला सांगीतले. एसटी गेल्यावर या चौघांना मारहाण करीत त्यांच्या कडील रक्कम आणि मेटल हिसकावून घेतले आणि दोन दुचाकी वाहनावावरुन चोरटे पळून गेले.

Robbery at Patas on Solapur road, ST passengers one deore 25 lakhs looted

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण