बडे उद्योगपती, बॉलीवूड स्टार्सनी धरला भारताबाहेरचा रस्ता, खासगी जेटने परदेशात रवाना


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशान एकीकडे कोरोनाने उच्छाद मांडला असताना बडे उद्योगपती, बॉलिवूडचे सुपरस्टार, सेलिब्रिटी, उच्चभ्रु मंडळी लाखो रुपये खर्चून भारताबाहेर जात आहेत.Rich peoples gone in another countries

कोरोना प्रसारामुळे देशाबाहेर जाणारी मंडळी युरोप, मध्यपूर्व आशिया आणि हिंद महासागरातील देशांत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. सेलिब्रिटी आणि उद्योगपती दहा पट अधिक पैसे मोजून दुबईला जात आहेत.



केवळ गर्भश्रीमंतच नाही तर ज्यांना खर्च परवडत आहे, अशीही मंडळी खासगी जेटने देशाबाहेर गेले आणि जात आहेत. कोरोनाच्या फैलावामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण येत असताना बॉलिवूडचे सुपरस्टार परदेशात रवाना होत आहेत.

अनेक सेलिब्रिटी मालदीव येथे असल्याचे उघड झाले आहे. ब्रिटन, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती, हॉंगकॉंग सारख्या देशांनी अनेक बंधने घातली आहेत. काही देशांकडून कडक नियम आणण्याची तयारी केली जात आहे.

मालदिव सरकारने भारतीय नागरिकांना देशात सर्वत्र फिरण्यास मनाई केली आहे. मात्र यातून काही रिसॉर्ट वगळल्याने तेथे गर्दी दिसून येत आहे.लंडन आणि दुबई येथे बंदी घालण्यापूर्वी बरीच भारतीय मंडळी तेथे पोचली.

नवी दिल्लीहून दुबईला जाण्याचे एकेरी तिकीट सुमारे १५ लाख रुपयांचे आहे. खासगी जेट कंपन्या रिटर्न जर्नीचे देखील शुल्क आकारत आहे. आता तत्काळ प्रवासासाठी लोकेशन खूपच कमी राहिले आहे.

कारण लंडनसारख्या शहरांनी निर्बंध आणल्याने प्रवासावर मर्यादा आणल्या आहेत. दुबईचे तिकीट सामान्यापेक्षा दहा पटीने अधिक आकारले जात आहे.

Rich peoples gone in another countries

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात