अभिनेता सोनू सूद चक्क झळकला स्पाईसजेटच्या बोईंग विमानावर

वृत्तसंस्था

नई दिल्ली: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने कोरोना संक्रमणात अनेक गोरगरीबाना प्रचंड मदत केली होती. या कार्याची दखल स्पाईसजेट कंपनीने घेतली असून त्याचे छायाचित्र विमानावर झळकवले आहे. Actor Sonu Sood shined brightly On SpiceJet’s Boeing aircraft

सोनू सूदचा गौरव करण्यासाठी त्याचे छायाचित्र विमानावर झळकवले आहे. सैल्यूट टू द सेविअर सोनू सूद” अर्थात मसीहा सोनू सूद को सलाम, असे वाक्य ही लिहून त्याच्या कार्याचा गौरव केला आहे.सोनूला जेव्हा आपला गौरव स्पाईसजेटने केल्याचे समजले तेव्हा तो भावूक झाला. मला अराखीव तिकिटावर पंजाबमधील मोगा ते मुंबई असा केलेला प्रवासच आठवला. माझ्यावर केलेल्या प्रेमाच्या वर्षावाने मी भरावून गेलो आहे. आज मला पालकांची आठवण मोठी आली. या ट्विटवर जोरदार प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.

Actor Sonu Sood shined brightly On SpiceJet’s Boeing aircraft

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*